अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेतील 12 व्या आणि साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने यूनायटेड अरब अमिरातीवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. भारताने 138 धावांचं आव्हान हे 16.1 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशी याने 76 तर आयुष म्हात्रे याने 67 धावांची खेळी केली. भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. भारताने या विजयासह उपांत्य अर्थात सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. यासह उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. ए ग्रुपमधून पाकिस्तान आणि टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. तर बी ग्रुपमधून श्रीलंका आणि बांगलादेशने सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे.
उपांत्य फेरीतील दोन्ही सामने एकाच दिवशी 6 डिसेंबर होणार आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. हा सामना दुबई येथे होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना शारजाह येथे होईल. दोन्ही संघांनी सेमी फायनलमध्ये विजय मिळवला तर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवता येईल. याआधी साखळी फेरीत दोन्ही संघ भिडले होते. तेव्हा पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यामुळे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये अंतिम सामना झाल्यास भारताला साखळी फेरीतील पराभवाचा वचपा घेता येईल.
श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. तर टीम इंडिया आणि बांगलादेशने प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत. तर 1-1 सामना गमावला आहे. तसेच ए ग्रुपमधील अफगाणिस्तानला साखळी फेरीतील 3 पैकी एकही सामना जिंकता आला नाही.तर नेपाळने 1 सामना जिंकत स्वत:ची लाज राखली. तर बी ग्रुपमधील यूएईने एकमेव सामना जिंकला. तर जपानलाही अफगाणिस्तानप्रमाणे विजयाचं खातं उघडता आलं नाही.
6 डिसेंबर, पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
6 डिसेंबर, इंडिया विरुद्ध श्रीलंका, शारजाह क्रिकेट स्टेडियम
8 डिसेंबर, अंतिम सामना, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम