अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील 12 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध संयुक्त अरब अमिराती आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे. यूएईचा नेट रनरेटचा अपवाद वगळता दोन्ही संघांची स्थिती सारखीच आहे. दोन्ही संघांनी 2 पैकी 1 सामना जिंकलाय तर 1 गमावलाय. पाकिस्तानने ए ग्रुपमधून उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलंय. त्यामुळे आता एका जागेसाठी या दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ जिंकतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही मोहम्मद अमान याच्या खांद्यावर आहे. तर अयान खान हा यूएईचं नेतृत्व करणार आहे.
इंडिया विरुद्ध यूएई यांच्यातील हा एकदिवसीय सामना बुधवारी 4 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
इंडिया विरुद्ध यूएई यांचत्यातील सामना हा शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
इंडिया विरुद्ध यूएई सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 10 वाजता टॉस होईल.
इंडिया विरुद्ध यूएई सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंडिया विरुद्ध यूएई सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
अंडर 19 टीम इंडिया : मोहम्मद अमान (कॅप्टन), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, केपी कार्तिकेय, निखिल कुमार, हरवंश सिंग (विकेटकीपर), हार्दिक राज, समर्थ नागराज, युधाजित गुहा, चेतन शर्मा, मोहम्मद एनान, प्रणव पंत, अनुराग कवाडे आणि किरण चोरमले.
अंडर 19 यूएई टीम: अयान अफझल खान (कर्णधार), यायिन राय, आर्यन सक्सेना, अक्षत राय, एथन डीसूझा, मुहम्मद रायन खान, नूरउल्ला अयोबी, उद्दीश सुरी, अब्दुल्ला तारिक, मुदित अग्रवाल (विकेटकीपर), अली असगर शुम्स, रचित घोष , हर्ष देसाई, फैसूर रहमान आणि करण धीमान.