आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा 13 वर्षीय युवा कोट्याधीश वैभव सूर्यवंशी याने धमाका केला आहे. टीम इंडियाच्या वैभव सूर्यवंशी याने अंडर 19 आशिया कप स्पर्धेत सलग दुसरं आणि स्फोटक अर्धशतक ठोकलं आहे. वैभवने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात यूएई विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर वैभवने आता उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत स्फोटक अर्धशतकी खेळी केली आहे. वैभवने टीम इंडियाला विजयासाठी मिळालेल्या 174 धावांचा पाठलाग करताना फक्त 36 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 6 फोरसह 186.11 च्या स्ट्राईक रेटने 67 रन्स केल्या. वैभवने या दरम्यान चौफेर फटकेबाजी करत टीकाकारांना चोख उत्तर दिलंय.
वैभवने डावातील 10 व्या ओव्हरदरम्यान अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने 24 बॉलमध्ये 208.33 च्या स्ट्राईक रेटने 4 सिक्स आणि 5 फोर ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने अर्धशतकानंतर अशीच फटकेबाजी सुरु ठेवली. वैभवला आणखी मोठी खेळी करता आली असती. मात्र वैभव 67 धावांवर आऊट झाला. वैभवला प्रवीण मनीषा याने बोल्ड केलं.
वैभवने याआधी बुधवारी 4 डिसेंबरला यूएईविरुद्ध 76 धावांची खेळी केली होती. यूएईने टीम इंडियाला विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या सलामी जोडीनेच 16.1 ओव्हरमध्ये पूर्ण करुन टीम इंडियाला 10 विकेट्सने विजयी केलं होतं. वैभवने त्या सामन्यात 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 76 धावा केल्या होत्या. तर आयुष म्हात्रेने नाबाद 67 धावांची खेळी केली होती.
एका ओव्हरमध्ये 31 धावा, वैभवचा धमाका
Vaibhav Sooryavanshi is making the Lankans tremble 💪
The 13-year-old scores 3️⃣1️⃣ runs in the 2️⃣nd over against 🇱🇰 in the #ACCMensU19AsiaCup Semi-Final 🔥
Watch #SLvIND, LIVE on #SonyLIV 📲 pic.twitter.com/ppIdd1BXA8
— Sony LIV (@SonyLIV) December 6, 2024
अंडर 19 श्रीलंका टीम : विहास थेवमिका (कर्णधार), पुलिंदू परेरा, दुल्निथ सिगेरा, शरुजन षणमुगनाथन (विकेटकीपर), विमथ दिनसारा, लक्विन अबेसिंघे, कविजा गमागे, विरण चामुदिथा, प्रवीण मनीषा, न्यूटन रंजित कुमार आणि मत्थुस.
अंडर 19 इंडिया प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, केपी कार्तिकेय, निखिल कुमार, हरवंश सिंग (विकेटकीपर), किरण चोरमले, हार्दिक राज, चेतन शर्मा आणि युधाजित गुहा.