अंडर 19 वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने विजयी सलामी दिली आहे.टीम इंडियाने निकी प्रसाद हीच्या नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताने हा सामना 9 विकेट्सने जिंकला आहे. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 68 धावांचं माफक आव्हान हे 7.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाची विजयी धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. टीम इंडियाने दुसऱ्याच बॉलवर पहिली विकेट गमावली. जी त्रिशा झिरोवर आऊट झाली. मात्र त्यानंतर कामिलीनी आणि सानिका चाळके या जोडीने 67 धावांची नाबाद भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियासाठी जी कामिलीनी हीने सर्वाधिक धावा केल्या. कामिलीने हीने 29 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा केल्या. तर सानिका चाळके हीने 3 चौकारांच्या मदतीने 17 चेंडूत नाबाद 19 केल्या.
पाकिस्तानने त्याआधी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय पाकिस्तानवर उलटला. भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानने गु़डघे टेकले. पाकिस्तानने पूर्ण 20 ओव्हर खेळून काढल्या. मात्र त्यांना 70 पारही मजल मारता आली नाही. पाकिस्तानने 7 विकेट्स गमावून 67 धावा केल्या. पाकिस्तानकडून कोमल खान हीने सर्वाधिक 24 धावांचं योगदान दिलं. तर फातिमा खान हीने 11 धावा केल्या. तर इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी दुहेरी आकडाही गाठू दिला नाही. जोशिथा व्हीजे, मिथिला व्ही आणि पारुनिका सिसोदीया या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर सोनम यादव हीने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. सोनमला तिच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
सानिका यादव ‘वूमॅन ऑफ द मॅच’
For her economical match-winning spell of 4/6, Sonam Yadav becomes the Player of the Match 👏👏
India register a 9-wicket win over Pakistan in the opening game of the #ACCWomensU19AsiaCup 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/C67SN1rX8Q#TeamIndia | #ACC pic.twitter.com/eLSRoCfqeG
— BCCI Women (@BCCIWomen) December 15, 2024
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : निकी प्रसाद (कॅप्टन), सानिका चाळके, जी त्रिशा, जी कामिलिनी (विकेटकीपर), भाविका अहिरे, मिथीला व्ही, जोशिथा व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदीया, आयुषी शुक्ला आणि शबनम एमडी शकील.
वूमन्स पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : झूफीशान अय्याझ (कॅप्टन), कोमल खान (विकेटकीपर), फिझा फैझ, क़ुर्रतुलैन, महम अनीस, फातीमा खान, रोझीना अक्रम, रावली फरहान, माहेनूर झेब, आरीशा अन्सारी आणि आलिसा मुखतीयार,