अंडर 19 वूमन्स आशिया वूमन्स कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे क्वालालांपूर, मलेशिया येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेत यजमान मलेशियासह एकूण 6 संघ सहभागी आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान,श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळचा समावेश आहे. या 6 संघांना 3-3 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहेत. टीम इंडियाने अंडर 19 वूमन्स आशिया कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात रविवार 15 डिसेंबरला पाकिस्तान विरुद्ध केली. टीम इंडियाने निकी प्रसाद हीच्या नेतृत्वात पाकिस्तानचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. त्यानंतर आता टीम इंडियाची युवा महिला ब्रिगेड दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.
टीम इंडिया आता शेजारी नेपाळविरुद्ध भिडणार आहे. नेपाळच्या कॅप्टन्सीची जबाबदारी ही पूजा महातो हीच्याकडे आहे. तर निकी प्रसाद भारताचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. टीम इंडिया आणि नेपाळने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे आता उभयसंघात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यातील टी 20 सामना हा मंगळवारी 17 डिसेंबर रोजी होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 11 वाजता टॉस होईल. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर हा सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल. हा सामना क्वालालंपूर, मलेशिया येथे बायुमास क्रिकेट ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडियाी विजयी सलामी, आता नेपाळची पाळी
#TeamIndia restrict Pakistan to 67/7 in their opening match of the #ACCWomensU19AsiaCup in Kuala Lumpur 👏👏
An impressive bowling performance from Sonam Yadav 🤩
Over to our batters 💪
Scorecard ▶️ https://t.co/C67SN1rX8Q#ACC pic.twitter.com/XwL9FQSXep
— BCCI Women (@BCCIWomen) December 15, 2024
अंडर19 आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसारे, मिथिला विनोद, जोशीता वीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी द्रीथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम आणि नंदना एस.
अंडर 19 नेपाळ वूमन्स टीम : पूजा महातो (कॅप्टन), सोनी पाखरीन, सना प्रवीण, ज्योत्स्निका मरासिनी, कुसुम गोदार, साबित्री धामी, कृष्णा गुरुंग, रिया शर्मा, रचना चौधरी, सीमाना केसी, स्नेहा महारा, अलिशा कुमारी यादव, तृषाना बीके, किरण कुमारी कुंवर आणि अनु कदायत.