केपटाऊन | आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 19 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. या 16 संघांना 4-4 हिशोबाने 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपचं आयोजन हे दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कपसाठी सज्ज आहे. उदय सहारन याच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे. हा सामना कधी, कुठे आणि केव्हा होणार, हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना शनिवारी 20 जानेवारी रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना हा मॅनगाँग ओव्हल ब्लूमफॉन्टेन येथे खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
अंडर 19 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडिया | उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, अरवेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी आणि नमन तिवारी.
बांग्लादेश टीम | महफुजूर रहमान रब्बी (कॅप्टन), आशिकुर रहमान शिबली, जिशान आलम, आरिफुल इस्लाम, मोहम्मद शिहाब जेम्स, अहरार अमीन, शेख परवेज जिबोन, वासी सिद्दीकी, मारूफ एम, चौधरी मोहम्मद रिजवान, आदिल बिन सिद्दीक, मोहम्मद अशरफुज्जामन, मोहम्मद रफी उज्जामन रफी, रहनत दौला बोरसन आणि इकबाल हुसैन एमन.