मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी स्वीकारली. तसेच फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाला 48.5 षटकात 179 धावांवर रोखलं. विजयासाठी दिलेल्या 180 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा दम निघाला. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याची उत्सुकता होती. एका विकेटनंतर पाकिस्तानच्या बाजूने, तर एका चौकाराने ऑस्ट्रेलियाच्या बाजूने सामना झुकत होता. पण शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. आता ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. यापू्र्वी ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन वेळा अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही वेळेस भारताने विजय मिळवला आहे. पण यावेळी ऑस्ट्रेलियाचा अंदाज काही वेगळा दिसत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार वेबगेनने बरंच काही सांगून गेला.
पाकिस्तान विरुद्धचा सामना एक क्षण गमवाल असं वाटत होतं. या प्रश्नावर ह्यू वेबगेन म्हणाला की,”काहीच शंका नव्हती, काम पूर्ण करण्यासाठी विड्स आणि राफवर पूर्ण विश्वास होता.” एकंदरीत सामन्याबाबत काय वाटतं या प्रश्नावरही त्याने उत्तर दिलं. “अँडरसनला बाहेर बसवण्याचा निर्णय खरंच कठीण होता, परंतु टॉम स्ट्रेकरने जबरदस्त गोलंदाजी केली. 17 वर्षीय पीकने मधल्या फळीत जबरदस्त फलंदाजी करत डाव पुढे सरकवला.”,असं ह्यू वेबगेन याने सांगितलं.
अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. यासाठी कशी तयारी असेल? असा प्रश्न विचारताच वेबगेनने आपल्या शैलीत उत्तर दिलं. “भारत एक चांगला संघ आहे. आम्हाला ते आव्हान पेलायला आवडेल.” , असं बोलून ह्यू वेबगेनने पॅट कमिन्स वक्तव्याची आठवण करून दिली. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पॅट कमिन्सने 1 लाख लोकांना एकावेळी गप्प करण्याचा आनंद वेगळा असल्याचं म्हंटलं होतं.
भारत अंडर 19 संघ: आदर्श सिंग, प्रियांशु मोलिया, रुद्र पटेल, सचिन धस, उदय सहारन (कर्णधार), आर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, अरवेली अवनिश राव (विकेटकीपर), इननेश महाजन (विकेटकीपर), आराध्या शुक्ला, धनुष गोवडा, मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे
ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघ: हॅरी डिक्सन, हरजस सिंग, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), ऑलिव्हर पीक, लचलान एटकेन (डब्ल्यू), राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा, महली बियर्डमन, कॅलम विडलर, रायन हिक्स, टॉम कॅम्पबेल, टॉम स्ट्रेकर, एडन ओ कॉनर, कोरी वॉस्ले