SA vs IND | टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने, सामना केव्हा?

| Updated on: Jan 01, 2024 | 3:29 PM

South Africa U19 vs India U19 Live Streaming | टीम इंडियाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत जोरदार सुरुवात केली. त्यानंतर आता टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार हे जाणून घेऊयात.

SA vs IND | टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने, सामना केव्हा?
Follow us on

जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिकेत 29 डिसेंबर ते 10 जानेवारी दरम्यान अंडर 19 ट्राय सीरिजचं आयोजन करण्यात आलं आहे. या ट्राय सीरिजमध्ये एकूण 3 संघांमध्ये 7 सामने पार पडणार आहे. या ट्राय सीरिजमध्ये क्रिकेट टीम इंडिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका 3 संघ सहभागी आहेत. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघानी प्रत्येकी 1-1 सामना खेळला आहे. तर अफगाणिस्तानने 2 मॅच खेळल्या आहेत. अफगाणिस्तानने 2 मधून 1 सामना जिंकलाय. तर टीम इंडियाने 1 सामना जिंकला. तर दक्षिण आफ्रिकेला अजून विजयाचं खातं उघडता आलेलं नाही.

या ट्राय सीरिजमधील टीम इंडियाचा दुसरा सामना हा दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका विजयी खातं उघडण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरेल. या सामन्याबाबत सर्वकाही जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया सामना केव्हा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया सामना मंगळवारी 2 जानेवारीला होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया सामना कुठे होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया सामना ओल्ड एडवर्डियन्स क्रिकेट क्लब ए ग्राउंड जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया सामना दुर्देवाने टीव्हीवर पाहता येणार नाही.

टीम इंडिया | उदय सहारण (कॅप्टन), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश राव (विकेटकीपर), सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्या शुक्ला , राज लिंबानी आणि नमन तिवारी.

दक्षिण आफ्रिका टीम | डेव्हिड टीगर (कर्णधार), ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराईस, रोमाशन पिल्ले, जुआन जेम्स, रिले नॉर्टन, न्कोबानी मोकोएना, क्वेना माफाका, मार्टिन खुमालो, एसोसा आयहेवबा, ऑलिव्हर खूमल व्हाइटहेड, मोंड सिफो पोट्साने आणि एनटांडो झुमा.