दक्षिण आफ्रिका : आफ्रिकेत अंडर 19 महिला वर्ल्ड कपच आयोजन करण्यात आलं आहे. अनेक महिला खेळाडू बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहेत. मात्र एका अनोळख्या गोलंदाजाने यॉर्कर किंग लसिथ मलिंगासारखा कारनामा केलाय. रवांडाची वेगवान गोलंदाज हेनरीट इशिम्वेने या स्पर्धेतील 14 व्या सामन्यात 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केलीय. हा सामना रवांडा विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात खेळवण्यात आला. हेनरीटच्या धमाकेदारा गोलंदाजीच्या दोरावर रवांडाने झिंबाब्वेलर 39 धावांनी विजय मिळवला.
हेनरिटने झिंबाब्वेच्या डावातील 19 व्या ओव्हरमध्ये हा चम्तकार केला. पहिल्या बॉलवर कुदजाई चिगोराला बोल्ड केलं. ओलिंडा 4 धावा करुन एलबीडबल्यू झाली. चिपो मोया बोल्ड झाली. तर आस्था नदलालंबीलाही मैदानाबाहेराचा रस्ता दाखवला. यासह हेनरिटने 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेतल्या. तसेच चौथी विकेट घेताच झिंबाब्वेचा डाव 80 धावांवर आटोपला.
4 बॉलमध्ये 4 विकेट्स
A double hat-trick!
What a moment for Henriette Ishimwe and Rwandan cricket ?
— ICC (@ICC) January 17, 2023
झिंबाब्वेने 18 व्या ओव्हरच्या 5 व्या बॉलवर सहावी विकेट गमावली होती. अशा प्रकारे झिंबाब्वेने शेवटची 5 विकेट्स 6 बॉलमध्ये गमावल्या. या दरम्यान एक रनही करता आली नाही. दरम्यान पहिले बॅटिंग करताना रवांडाने 119 धावा केल्या. रवांडानेही 7 बॉलमध्ये 4 विकेट्स गमावल्या. झिंबाब्वेचा डाव 80 धावांवर आटोपल्याने रवांडाचा 39 धावांनी विजय झाला. रवांडाचा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला.
गोलंदाजाने 4 बॉलमध्ये सलग 4 विकेट्स घेण्याची ही चौथी वेळ ठरलीय. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने 2 वेळा 4 विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगाने एकदा वनडे आणि एकदा टी 20 मध्ये हा कारनामा केलाय. तर आयर्लडंच्या कर्टिस कॅम्पर, अफगाणिस्तानचा राशिद खान आणि विडिंजच्या जेसन होल्डरनेही ही कामगिरी केलीय.