मुंबई | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा थरार दिवसेंदिवस रंगत आहे. स्पर्धेत आतापर्यंत अनेक थरारक सामने झाले आहेत. क्रिकेट चाहत्यांना आणखी असाच एक चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. गुरुवारी 26 जानेवारी रोजी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील 19 वा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात पार पडला. नेपाळने 1 विकेटने विजय मिळवत अफगाणिस्तान विरुद्ध उलटफेर केला. नेपाळने या विजयासह सुपर 6 मध्ये धडक मारली.
अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र नेपाळच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानचा बॅटिंगचा निर्णय चुकीचा ठरवला. नेपाळने अफगाणिस्तानला 40.1 ओव्हरमध्ये 145 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे नेपाळला विजयासाठी 146 धावांचं आव्हान मिळालं.
नेपाळचीही या विजयी धावांचा पाठलाग करताना हवा टाईट झाली होती. अफगाणिस्ताननेही नेपाळवर घट्ट पकड मिळवली होती. नेपाळची 146 धावांचा पाठलाग करताना चांगलीच दमछाक झाली. नेपाळची 44 व्या ओव्हरपर्यंत 144 अशी स्थिती झाली होती. आता नेपाळला विजयासाठी 2 आणि अफगाणिस्तानला 1 विकेटची गरज होती. दोघांनाही जिंकण्याची समसमान संधी होती. मात्र नेपाळने बाजी मारली.
नेपाळने 44.4 ओव्हरमध्ये 1 विकेट राखून सामना जिंकला. नेपाळचा हा सलग 2 पराभवानंतर पहिला विजय ठरला. तर अफगाणिस्तानने पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली.
दरम्यान डी ग्रुपमध्ये नेपाळसह 3 आशिया टीमचा समावेश आहे. यामध्ये पाकिस्तान, नेपाळ आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडने दोन्ही सामन्यात विजय मिळवलाय. मात्र पाकिस्तानचा नेट रनरेट चांगला असल्याने ते पहिल्या स्थानी आहे. तर नेपाळ तिसऱ्या आणि अफगाणिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.
नेपाळचा पहिलाच पण थरारक विजय
A stunning one-wicket win over Afghanistan gives the Rhinos a spot in the Super Six stage of the #U19WorldCup 😯#AFGvNEP pic.twitter.com/c2cq003KAH
— ICC (@ICC) January 26, 2024
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | नसीर खान मारूफखिल (कर्णधार), हसन इसाखिल, जमशीद झदरन, खालिद तानिवाल, सोहेल खान झुरमाती, नुमान शाह (विकेटकीपर), अली अहमद, अरब गुल मोमंद, अल्लाह गझनफर, फरीदून दाऊदझाई आणि खलील अहमद.
नेपाळ प्लेईंग ईलेव्हन | देव खनाल (कॅप्टन), अर्जुन कुमाल, बिपिन रावल (विकेटकीपर), आकाश त्रिपाठी, गुलसन झा, दीपक डुमरे, दिपक बोहरा, दिपेश कंडेल, सुभाष भंडारी, टिळक भंडारी आणि आकाश चंद.