U19 Wc 2024 IND vs IRE | आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राच्या या दोघांना संधी

| Updated on: Jan 25, 2024 | 2:00 PM

Team India | आयर्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये महाराष्ट्राच्या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. कोण आहेत ते दोघे?

U19 Wc 2024 IND vs IRE | आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राच्या या दोघांना संधी
Follow us on

मुंबई | आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 15 व्या सामन्यात ग्रुप ए मधील टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड आमेनसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे मॅनगाँग ओव्हलमधील ब्लूमफॉन्टेन येथे करण्यात आलं आहे. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील साखळी फेरीतील दुसरा आणि आयर्लंडचा तिसरा सामना आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन उदय सहारन याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील खेळाडूंचा समावेश केला आहे.

आयर्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी बीडच्या सचिन धस याला संधी देण्यात आली आहे. तर सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णी याचाही टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. तर आयर्लंडचा हा अखेरचा साखळी सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये आयर्लंडने एकदा विजय मिळवलाय. तर एक सामना गमावलाय. त्यामुळे आयर्लंडसाठी हा सामना करो या मरो असा आहे.

हे सुद्धा वाचा

तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळला. तर साखळीतील तिसरा आणि अंतिम सामना हा यूनायटेड स्टेटस विरुद्ध 28 जानेवारी रोजी होणार आहे.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडियाची आधी बॅटिंग

आयर्लंड प्लेईंग ईलेव्हन | फिलिपस ले रॉक्स (कॅप्टन), जॉर्डन नील, रायन हंटर (विकेटकीपर), कियान हिल्टन, स्कॉट मॅकबेथ, जॉन मॅकनॅली, कार्सन मॅककुलो, ऑलिव्हर रिले, मॅकडारा कॉस्ग्रेव्ह, डॅनियल फोर्किन आणि फिन लुटन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंह, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सचिन धस, मुरुगन अभिषेक, धनुष गौडा, सौम्य पांडे आणि नमन तिवारी.