मुंबई | मुशीर खान याने केलेल्या तडाखेदार 131 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 296 धावांचं आव्हान दिलं आहे. सुपर 6 मधील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 295 धावा केल्या. टीम इंडियाकडून मुशीर खान यानेच सर्वाधिक धावा केल्या. मुशीरचं या स्पर्धेतील हे दुसरं शतक ठरलं. मुशीर व्यतिरिक्त सलामीवीर आदर्श सिंह याने 52 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिलं.
टीम इंडियाकडून मुशीरने 126 बॉलमध्ये 131 धावांची खेळी केली. मुशीरच्या या खेळीत 13 चौकार आणि 3 षटाकारांचा समावेश होता. आदर्श सिंह याने 58 बॉलमध्ये 6 चौकारांसह 52 धावा केल्या. कॅप्टन उदय सहारन याने 34 धावांचं योगदान दिलं. अरावेली अविनाश, सचिन धस आणि प्रियांशू मुलिया या तिघांनी अनुक्रमे 17, 15 आणि 10 अशा धावा केल्या. मु्र्गन अभिषेक 4 धावांवर बाद झाला. तर गेल्या सामन्यातील हिरो ठरलेला अर्शीन कुलकर्णी आता मात्र फ्लॉप ठरला. अर्शीनने 9 धावा केल्या. तर नमन तिवारी आणि राज लिंबानी ही जोडी नाबाद परतली.
न्यूझीलंडकडून मेसन क्लार्क याने 4 विकेट्स घेतल्या. तर रायन त्सोर्गस, इवाल्ड श्र्युडर, झॅक कमिंग आणि ऑलिव्हर टेवाटिया या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
मुशीर खानची शतकी खेळी
Innings Break!
A splendid 1⃣3⃣1⃣ from Musheer Khan propels #TeamIndia to 295/8 👌👌
Over to our bowlers 💪
Scorecard ▶️ https://t.co/UdOH802Y4s#BoysInBlue | #INDvNZ pic.twitter.com/eC5SOg7CEh
— BCCI (@BCCI) January 30, 2024
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | ऑस्कर जॅक्सन (कॅप्टन), जेम्स नेल्सन, टॉम जोन्स, स्नेहिथ रेड्डी, लचलान स्टॅकपोल, ऑलिव्हर टेवाटिया, झॅक कमिंग, एलेक्स थॉम्पसन (विकेटकीपर), इवाल्ड श्र्युडर, रायन त्सोर्गस आणि मेसन क्लार्क.
टीम इंडिया प्लेईग इलेव्हन | उदय सहारण (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी आणि सौम्य पांडे.