वेलिंग्टन | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात गुरुवार 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे. तर टीम इंडियाचे 11 शिलेदार हे टॉसनंतरच ठरतील. या कसोटी मालिकेची लगबग सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे अंडर 19 वर्ल्ड कपकडेही आहे.
उदय सहारन याच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने बांगलादेशवर विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना हा आयर्लंड विरुद्ध असणार आहे. तर आयर्लंडचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे. हा सामना कुठे आणि कधी पाहता येईल, हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना गुरुवारी 25 जानेवारी रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना मॅनगाँग ओव्हल, ब्लूमफॉन्टेन येथे आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहता येईल.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला, इनेश महाजन, धनुष गौडा, रुद्र पटेल , प्रेम देवकर , मोहम्मद अमान आणि अंश गोसाई.
आयर्लंड टीम | फिलिपस ले रॉक्स (कॅप्टन), जॉर्डन नील, रायन हंटर (विकेटकीपर), गेविन रौल्स्टन, कियान हिल्टन, स्कॉट मॅकबेथ, जॉन मॅकनॅली, हॅरी डायर, कार्सन मॅककुलो, ऑलिव्हर रिले, रूबेन विल्सन, मॅकडारा कॉसग्रेव्ह, फिन लुटन, मॅथ्यू वेल्डन आणि डॅनियल फोर्किन.