मुंबई | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात पोहचली आहे. वर्ल्ड कप सेमी फायनसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. आता या सेमी फायनलमधील पहिला सामना हा टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी टीम थेट फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा सेमी फायनल सामना कधी आणि कुठे होणार हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेमी फायनल सामन्याला भारतीय वेळेनुसार 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल. हा सामना सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहता येईल.
टीम इंडियाने आतापर्यंत या वर्ल्ड कपमधील सर्व सामने जिंकले आहेत. साखळी फेरीतील 3 सामन्यानंतर सुपर 6 मध्येही टीम इंडियाने विजय मिळवला. आता टीम इंडियाचा विजयी षटकार मारण्याचा प्रयत्न असणार आहे.
मंगळवारी टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने
The #BoysInBlue are geared up for Semi-Final 1⃣ in the #U19WorldCup 👌👌#TeamIndia will face South Africa U19 tomorrow at the Willowmoore Park, Benoni 🙌
Follow the match on https://t.co/Z3MPyeL1t7 or the official BCCI App 📱 pic.twitter.com/zQKBKf7Nfb
— BCCI (@BCCI) February 5, 2024
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला, इनेश महाजन, धनुष गौडा, रुद्र पटेल , प्रेम देवकर , मोहम्मद अमान आणि अंश गोसाई.
दक्षिण आफ्रिका टीम | जुआन जेम्स (कॅप्टन), ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराइस, रोमाशन पिल्ले, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, न्कोबानी मोकोएना, क्वेना माफाका, मार्टिन खुमालो, ऑलिव्हर व्हाइटहेड, सिफो पोटसेन, एन्तांडो झुमा आणि रईक डॅनियल्स.