मुंबई | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 सुपर 6 मधील टीम इंडियाचा दुसरा सामना हा नेपाळ विरुद्ध आहे. हा दुसरा सामना ब्लोमफोंटेन मधील मँगोंग ओव्हल या मैदानात आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडियाने याच मैदानात सुपर 6 मधील आपला पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. टीम इंडियाने तो सामना 214 धावांनी जिंकला होता. आता नेपाळ विरुद्ध विजय मिळवून टीम इंडियाचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल, तसेच हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल हे जाणून घेऊयात.
या खेळपट्टीवर सुरुवातीच्या ओव्हरमध्ये ओलावा असतो. तसेच बॅट्समन या खेळपट्टीवर एकदा का सेट झाला, तर तो मोठी खेळी करतोच. तसेच वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटूंनाही स्विंग करण्यास मदत होते. त्यामुळे नेपाळ विरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंना बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करण्यास फार स्कोप आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना 2 फेब्रुवारी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर फुकटात पाहता येईल.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला, इनेश महाजन, धनुष गौडा, रुद्र पटेल , प्रेम देवकर , मोहम्मद अमान आणि अंश गोसाई.
नेपाळ अंडर 19 क्रिकेट टीम | देव खनाल (कॅप्टन), अर्जुन कुमल, बिपिन रावल (विकेटकीपर), आकाश त्रिपाठी, गुलसन झा, दीपक डुमरे, दिपक बोहरा, दिपेश कंडेल, सुभाष भंडारी, तिलक भंडारी, आकाश चंद, उत्तम थापा मगर, दुर्गेश गुप्ता, हेमंत धामी, बिशाल बिक्रम केसी आणि दीपक बोहरा.