बेनोनी | अंडर 19 वर्ल्ड कप फायनल 2024 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने महाअंतिम सामन्यात टीम इंडियावर 79 धांवांनी मात केली. टीम इंडियाचं या पराभवासह सहाव्यांदा विश्व विजेता होण्याचं स्वप्न भंगलं. तसेच ऑस्ट्रेलियाने गेल्याने 8 महिन्यात टीम इंडियाला तिसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत केलं. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, वनडे वर्ल्ड कपनंतर आता अंडर 19 वर्ल्ड कप अशा एकूण 3 महाअंतिम सामन्यात टीम इंडिया अपयशी ठरली. तर ऑस्ट्रेलियाची अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्याची ही चौथी वेळ ठरली. टीम इंडियाच्या नावावर या पराभवासह नकोसा विक्रम झाला आहे.
टीम इंडियाची बॅटिंग लाईन ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फ्लॉप ठरली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 254 धावांचा पाठलाग करतताना टीम इंडियाचा डाव 43.1 ओव्हरमध्ये 174 धावांवर आटोपला. टीम इंडियाला यासह मोठा डाग लागला. नक्की काय झालं, ते आपण जाणून घेऊयात.
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या 36 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हंगामात टीम इंडियाची सलामी जोडी अर्धशतकी भागीदारी करु शकली नाही. टीम इंडियासाठी या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये अर्शीन कुलकर्णी आणि आदर्श सिंह या जोडीने ओपनिंग केली. टीम इंडियाने अंतिम सामन्यात तर कहरच केला. टीम इंडियाने पहिली विकेट अवघ्या 3 धावांवरच गमावल्या. त्यामुळे टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळू शकली नाही.
आदर्श सिंह याने अंतिम सामन्याआधी उर्वरित स्पर्धेत 2 वेळा अर्धशतकी खेळी केली. तर अर्शीनने यूएसए विरुद्ध शतक ठोकलं होतं. दोघांनी वैयक्तिक पातळीवर फलंदाजी केली. मात्र या दोघांना ओपनिंग पार्टनरशीप करुन देता आली नाही.
टीम इंडिया अंडर 19 प्लेईंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 प्लेईंग ईलेव्हन | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर.