मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उत्कंठावर्धक विजय टीम इंडियाने मिळवला. दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी 245 धावांचं आव्हान दिलं होतं. पण आघाडीचे 4 फलंदाज अवघ्या 32 धावांमध्ये बाद झाल्याने पराभव निश्चित असल्याचं अंदाज अनेकांनी बांधला होता. पण पाचव्या गड्यासाठी कर्णधार उदय सहारन आणि बीडच्या सचिन धसने डाव सावरला. पाचव्या गड्यासाठी 171 धावांची भागीदारी केली. या मोठ्या भागीदारीमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला. सचिन धसचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. पण तिथपर्यंत सामना एका रिलॅक्स मोडवर आला होता. त्यानंतर हा सामना संपवण्याचं काम उदय सहारन याने केलं. सचिन धसने 95 चेंडूत 96 धावांची खेळी केली. यात 11 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. तर कर्णधार उदय सहारने याने 124 चेंडूत 81 धावांची खेळी केली. या सामन्यानंतर उदय सहारन आणि सचिन धस यांनी एकमेकांना प्रश्न विचारले आणि उत्तर दिली.
सचिन धस : नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आपल्या संघाचा कर्णधार उदय सहारन आहे. उदय विजयानंतर कसं वाटते? इतका क्लोज सामना झाला.
उदय सहारन : खूपच छान वाटत आहे. इतका क्लोज सामन्याची मजा काही औरच आहे. खरंच सांगायचं तर या वेळेला खूप वेगळं वाटत आहे.
उदय सहारन : सचिन तीन गडी बाद झाले होते तेव्हा तू फलंदाजीसाठी आला. तेव्हा डोक्यात काय सुरु होतं? किती प्रेशर होतं?
सचिन धस : त्यांची गोलंदाजी चांगली होत होती. त्यामुळे मला खेळपट्टीवर काही काळ काढायचा होता. उदय मला वारंवार प्रेरणा देत होता. आपण करू शकतो. शेवटपर्यंत खेळायचं आहे.
"There a different satisfaction in winning such a closely contested game.”
Uday Saharan and Sachin Dhas on their stunning partnership that helped India make it to the #U19WorldCup 2024 Final 👇https://t.co/7RroSx3PWo
— ICC (@ICC) February 7, 2024
सचिन धस : उदय आपण दोघांनी दोन सामन्यात चांगली पार्टनरशिप केली. कसं वाटते माझ्यासोबत खेळून?
उदय सहारन : सचिनसोबत खेळण्याची मजा काही वेगळीच आहे. त्याच्या स्वभावात बरीच सकारात्मकता आहे. त्याने माझी मदत झाली. चौकारसह एक एक धावांवरही लक्ष होतं. आमच्यात चर्चा होत होती. जितकं शक्य होईल तितका सामना जवळ खेचायचा होता. सामना संपवूनच यायचा हा विचार होता.
सचिन धस : राज बॅटिंगला आला तेव्हा त्याने पहिल्याच चेंडूवर लांब षटकार मारला? तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती?
उदय सहारन : खरं सांगायचं तर वेळ अशी होती की प्रेशर डोक्यावर वाढत चाललं होतं. कारण बॉलर फलंदाजीसाठी आला होता. त्यामुळे मला शेवटपर्यंत खेळावं लागणार होतं. राजने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्या षटकारामुळे मी इतका रिलीफ झालो की सांगूच शकत नाही. त्यामुळे विजय सोपा झाला.
सचिन धस : राजने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला तेव्हा सर्व मुलं मैदानात धावत आली. तेव्हा नेमक्या कश्या भावना होत्या?
उदय सहारन : खरं सांगायचं तर खूपच भावनिक होतं. बरं वाटलं ते सर्व आले. अशी फिलिंग परत परत मिळत नाही.परत असं व्हावं असं वारंवार वाटत होतं.