मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येक सामन्यात कोणी ना कोणी विजयाचा शिल्पकार ठरला आहे. त्यामुळे एक दोन खेळाडूच वरचढ ठरतील हा अंदाज चुकीचा आहे. त्यामुळे ऐनवेळी कोणाची बॅट तळपेल किंवा कोण भेदक गोलंदाजी करेल सांगता येत नाही. त्यात खेळपट्टीचा अंदाजही महत्त्वाचा ठरतो. पाटा विकेटवर खोऱ्याने धावा होतात. तर उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाज वरचढ ठरतात. त्यामुळे खेळपट्टीच्या अंदाजापासून खेळाडूंचा फॉर्म खूपच महत्त्वाच ठरतो. उपांत्य फेरीत भारताचे आघाडी फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यानंतर सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांनी डाव सावरला. साखळी फेरीत मुशीर खानची बॅट तळपली होती. त्याच्यामुळे कोणता प्लेयर कसा चमकेल सांगता येत नाही.
विलोमूर पार्क येथील खेळपट्टीवर फलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. या मैदानात पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी 190 च्या आसपास राहिली आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला खेळपट्टी फायदेशीर आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला जाईल.
भारत अंडर-19: आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.
ऑस्ट्रेलिया अंडर-19: हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर.