ICC U19 World Cup Final Match 2022, IND vs ENG LIVE Streaming : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत-इंग्लंड यांच्यातला अंतिम सामना?

| Updated on: Feb 05, 2022 | 10:54 AM

19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा (U19 World Cup) अंतिम सामना आज होणार आहे, ज्यात भारतीय संघ इंग्लंड (India vs England) विरुद्ध दोन हात करणार आहे. भारताच्या नजरा पाचव्या विजेतेपदावर आहेत.

ICC U19 World Cup Final Match 2022, IND vs ENG LIVE Streaming : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत-इंग्लंड यांच्यातला अंतिम सामना?
India U-19 Team
Follow us on

मुंबई : 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा (U19 World Cup) अंतिम सामना आज होणार आहे, ज्यात भारतीय संघ इंग्लंड (India vs England) विरुद्ध दोन हात करणार आहे. भारताच्या नजरा पाचव्या विजेतेपदावर आहेत. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने एका बाजूला कोरोनाशी झुंज दिली, तर दुसरीकडे मैदानावर प्रत्येक संघाला नमवलं. उपांत्य फेरीपूर्वी संघ पूर्णपणे सावरला. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. लीगमधील सर्व सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा (Bangladesh) पराभव केला आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.

यश धुलच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडचा 96 धावांनी पराभव करत सलग चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. धुलने 110 चेंडूत 110 धावा केल्या आणि उपकर्णधार शेख रशीदसोबत 204 धावांची भागीदारी केली. राशिदने 108 चेंडूत 94 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना दोघांनी संघाला पाच विकेट्सच्या बदल्यात 290 धावांपर्यंत मजल मारुन दिली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आणि इंग्लंडचा डाव 41.5 षटकांत 194 धावांत गुंडाळला. इंग्लंडकडून फक्त लचलान शॉ 51 धावा करू शकला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

19 वर्षांखालील विश्वचषकात भारताचा आजवरचा प्रवास

19 वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. टीम इंडियाने 2000, 2006, 2008, 2012, 2016, 2018, 2020 आणि या वर्षी अंतिम फेरी गाठली आहे. भारताने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर 2006, 2016 आणि 2020 मध्ये अंतिम फेरीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना कधी होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज (5 फेब्रुवारी) संध्याकाळी अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना कोठे खेळवला जाईल?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना अँटिग्वा येथील व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?

भारतीय वेळेनुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह टेलिकास्ट) कोठे पाहू शकतो?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिनीवर होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर होणार आहे. त्याचवेळी, tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

इतर बातम्या

एकवेळचा स्लोअर, यॉर्कर गोलंदाजीचा ‘बादशाह’, पण आता गावस्करांनाही ‘तो’ संघात खटकतोय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेआधी टीम इंडियाचा कसून सराव! अहमदाबादमध्ये कसा गाळला घाम? पाहा Photo

Sourav Ganguly: हार्दिक पंड्याला थेट टीम इंडियात एंट्री नाही? सौरव गांगुलीने दिले महत्त्वाचे संकेत