शारजाह | यूएई विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात मंगळवारी 2 जानेवारी रोजी तिसरा आणि अखेरचा टी 20 क्रिकेट सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. इब्राहिम झद्रान याच्याकडे अफगाणिस्तानचं नेतृत्व आहे. तर मुहम्मद वसीम हा यूएईची कॅप्टन्सी करणार आहे. सध्या ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना हा मालिकेच्या हिशोबाने निर्णायक ठरणार आहे. तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे यूएई आणि अफगाणिस्तान यांच्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे.
अफगाणिस्तानने 29 डिसेंबरला झालेला पहिला सामना हा 72 धावांनी जिंकला. अफगाणिस्तानने यूएईसमोर 204 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र यूएईला अफगाणिस्तानच्या बॉलिंगसमोर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 131 धावाच करता आल्या. अफगाणिस्तानने अशाप्रकारे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिला सामना गमावल्याने दुसरा सामना यूएईसाठी करो या मरो असा होता. यूएईने दुसऱ्या सामन्यात चमत्कार करत उलटफेर केला.
यूएईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला 167 धावांचं आव्हान मिळालं. मात्र यूएईने 167 धावांचा शानदार बचाव करत अफगाणिस्तानला 19.5 ओव्हरमध्ये 155 धावांवर गुंडाळलं. यूएईने अशाप्रकारे मालिकेत 1-1 बरोबरी साधली. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगली चढाओढ आणि रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. आता तिसरा सामना आणि मालिका कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मालिका कोण जिंकणार?
The two captains pose with the Dafa News UAE vs Afghanistan T20 series trophy ahead of the second T20I which begins at the Sharjah Cricket Stadium at 6pm#UAEvAFG pic.twitter.com/angUIlSn1p
— UAE Cricket Official (@EmiratesCricket) December 31, 2023
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), अजमतुल्ला ओमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, दरविश रसूली, कैस अहमद, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी, करीम जनात, रहमत शाह, फरीद अहमद मलिक, शराफुद्दीन अश्रफ, सेदिकुल्ला अटल, मोहम्मद इशाक आणि मोहम्मद सलीम साफी.
यूएई क्रिकेट टीम | मुहम्मद वसीम (कर्णधार), अली नसीर, अयान अफझल खान, बासिल हमीद, ध्रुव पराशर, खालिद शाह, मुहम्मद जवादुल्ला, जुनैद सिद्दिकी, निलांस केसवानी, ओमिद रहमान, अकीफ राजा, तनिश सुरी, वृत्य अरविंद आणि समल उदावत्था.