आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात यूएसने यूएईवर 136 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. यूएसने यूएईला विजयासाठी 340 धावांचं अवघड आव्हान दिलं होतं. मात्र यूएसच्या धारदार बॉलिंगसमोर यूएईचा डाव 37 षटकांच्या आतच आटोपला. यूएसने यूएला 362 ओव्हरमध्ये 203 धावांवर गुंडाळलं. यूएईकडून तिघांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र इतर फलंदाजांनी यूएसच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. यूएसकडून मराठमोळ्या सौरभ नेत्रवाळकर आणि नॉथुश केंजिगे या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. यूएसचा हा या स्पर्धेतील 8 सामन्यांमधील सहावा विजय ठरला. यूएसने या विजयासह 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
यूएईकडून राहुल चोप्रा, आसिफ खान आणि बासिल अहमद या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. राहुल, आसिफ आणि बासील या तिघांनी अनुक्रमे 52, 51 आणि 50* अशा धावा केल्या. आर्यांश शर्मा कॅप्टन मुहम्मद वसीम आणि अयान खान या तिघांनी दुहेरी आकडा गाठला. या तिघांनी 11, 12 आणि 10 अशा धावा केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांना काही खास करता आलं नाही. बासीलने अखेरपर्यंत नाबाद राहत नाबाद 50 धावा केल्या. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने योग्य साथ मिळाली नाही. यूएसकडून सौरभ आणि नॉथुश या दोघांशिवाय जसदीप सिंह याने 2 विकेट्स मिळवल्या. तर मिलिंद कुमार आणि शेडली व्हॅन शाल्क्विक या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
त्याआधी यूएईने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेत यूएसला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यूएसने या संधीचा फायदा घेतला. यूएसची निराशाजनक सुरुवात झाली. मात्र त्यानंतर साईतेजा मुक्कामल्ला आणि मिलिंद कुमार या दोघांनी शतकी खेळी केली. अँड्रिज गस-कॅप्टन मोनांक पटेल 5 आणि स्मित पटेल 48 धावांवर बाद झाले. त्यामुळे यूएसची 3 बाद 74 अशी स्थिती झाली.
त्यानंतर साईतेजा मुक्कामल्ला आणि मिलिंद कुमार या जोडीने चौथ्या विकेटसाठी 191 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी शतक झळकावलं. साईतेजा याने 99 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 107 धावांची खेळी केली. मिलिंद कुमार याने 110 बॉलमध्ये 14 फोर आणि 5 सिक्ससह नॉट आऊट 155 रन्स केल्या. तर शायन जहांगीर 12 धावांवर नाबाद परतला. यूएईकडून अयान खान याने 2 विकेट्स घेतल्या. तर अली नसीर आणि जुनैद सिद्दीकी या जोडीने 1-1 विकेट घेतली.
यूएसचा 136 धावांनी विजय
USA seal impressive win in the #CWCL2 clash against UAE 👏
Catch all the live action from the tournament on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺#UAEvUSA: https://t.co/CMnRev0jGj pic.twitter.com/MiFfcQHU7I
— ICC (@ICC) September 24, 2024
संयुक्त अरब अमिराती प्लेइंग इलेव्हन : मुहम्मद वसीम (कर्णधार), आर्यनश शर्मा (विकेटकीपर), विष्णू सुकुमारन, आसिफ खान, राहुल चोप्रा, बासिल हमीद, अली नसीर, अयान अफजल खान, राहुल भाटिया, जुनैद सिद्दीकी आणि ओमिद रहमान.
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन : मोनांक पटेल (कॅप्टन), स्मित पटेल (विकेटकीपर), अँड्रिज गस, साईतेजा मुक्कामल्ला, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, शेडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, यासिर मोहम्मद आणि सौरभ नेत्रावाळकर.