Asia Cup : आशिया कप स्पर्धेवर भारतीय महिला संघाने कोरलं नाव, 41 धावांनी बांग्लादेशवर मिळवला विजय

| Updated on: Dec 22, 2024 | 10:22 AM

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि बांग्लादेश हे दोन संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल बांगलादशेच्या बाजूने लागला पण सामन्यावर पकड भारताने मिळवली. गोंगाडी त्रिदशाच्या खेळीमुळे भारताला विजय मिळवण्यात यश आलं.

Asia Cup : आशिया कप स्पर्धेवर भारतीय महिला संघाने कोरलं नाव, 41 धावांनी बांग्लादेशवर मिळवला विजय
Follow us on

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि बांग्लादेश हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बांगलादेशचा हा निर्णय सुरुवातीचे काही विकेट गेल्यानंतर योग्यच होता असं म्हणावं लागेल. पण गोंगाडी त्रिशा हीने एका बाजूने मोर्चा सांभाळला. एका बाजूला धडाधड विकेट पडत असताना गोंगाडी त्रिदशाने 47 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी खेळी करू शकलं नाही. सानिका चाळके तर आपलं खातंही खोलता आलं नाही. कमलिनी जी आणि ईश्वरी अवसरे यांना प्रत्येकी 5 धावाच करता आल्या.निक्की प्रसादने 12, मिथिला विनोदने 17, आयुषी शुक्लाने 10 धावा केल्या. तर जोशिथा 2 आणि शबनम शकील 4 धावांवर नाबाद राहिल्या.

भारताने 7 गडी गमवून 20 षटकात 117 धावा केल्या आणि विजयासाठी 118 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान बांगलादेशला काही गाठता आलं नाही. बांगलादेशचा संपूर्ण संघ 76 धावांवर बाद झाला. दुसऱ्या षटकात बांगलादेशला पहिला धक्का बसला. मोसमत इवाला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर आलेली सोमेया अक्तरही 8 धावांवर बाद झाली. फहोमिदा चोया आणि जुएरिया फिरदौस यांनी काही अंशी डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही फार काही यश आलं नाही. या दोघांव्यतिरिक्त बांगलादेशचे इतर खेळाडू एकेरी धावांवरच तंबूत परतले. त्यामुळे भारताचा विजय पक्का होत गेला. भारताकडून सोनम यादवने सर्वात चांगला स्पेल टाकला. 4 षटकात 3 धावा देत 2 गडी गडी बाद केले.

15 दिवसांपूर्वी भारत आणि बांगलादेश पुरुष संघ अंतिम फेरीत भिडले होते. तेव्हा बांगलादेशने भारताला पराभवाचं पाणी पाजलं होतं.  पण महिला संघाने ती चूक केली नाही. बांगलादेशला त्याची जागा दाखवून देत जेतेपदावर नाव कोरलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेशचा संघ : सुमैया अक्तर (कर्णधार), सुश्री इवा, फाहोमिदा चोया, हबीबा इस्लाम पिंकी, जुएरिया फिरदौस, फरजाना इस्मिन, अनिसा अक्टर सोबा, सुमैया अक्तर सुबोर्णा, निशिता अक्टर निशी, जनाना मौआ, सादिया अक्तर.

भारताचा संघ : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके, जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, आयुषी शुक्ला, एमडी शबनम.