दुबई | अझान अवैस याच्या नाबाद दमदार शतकाच्या जोरावर क्रिकेट पाकिस्तानने अंडर 19 आशिया कप 2023 स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 260 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानने हे आव्हान 47 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पाकिस्तानकडून अझानने नाबाद 105 धावा केल्या. तर साद बेग आणि शाहाझैब खान या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानच्या बॅटिंगसमोर टीम इंडियाचे गोलंदाज निष्प्रभ ठरले.
पाकिस्तानकडून शमिल हुसैन आणि शाहजैब खान या सलामी जोडीने 28 धावा जोडल्या. शमिल हुसैन 8 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर शाहजैब आणि अझान अवैस या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांमध्ये 110 रन्सची पार्टनरशीप झाली. मुर्गन अभिषेक याने ही सेट जोडी फोडली. शाहजैब 88 बॉलमध्ये 63 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कॅप्टन साद बैग मैदानात आला. त्यानंतर साद आणि अझान या जोडीने पाकिस्तानला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 125 धावांनी नाबाद भागीदारी केली.
अझानने 130 बॉलमध्ये 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 105 धावांची खेळी केली. तर कॅप्टन साद बैग याने 1 सिक्स आणि 8 चौकारांच्या मदतीने 51 बॉलमध्ये नाबाद 68 धावा केल्या. टीम इंडियाकडून मुर्गन अभिषेक यानेच दोन्ही विकेट घेतल्या. तर इतर गोलंदाजांना पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्यात यश आलं नाही.
पाकिस्तानचा विजय
Clinical 8️⃣-wicket win against India U19 🙌
Sensational batting by Azan Awais, Saad Baig and Shahzaib Khan as 🇵🇰 make it two wins in a row 💫#PAKvIND | #PakistanFutureStars pic.twitter.com/eQK0OqlNzF
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 10, 2023
दरम्यान अझान अवैस याने केलेल्या नाबाद विजयी शतकी खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. अझानने टीम इंडिया विरुद्धच्या या हायव्होल्टेज सामन्यात कॅप्नटन्सीसह बॅटिंग अशी दुहेरी जबाबदारी सार्थपणे पार पडत टीमच्या विजयात खारीचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा बहुमान देण्यात आला.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | साद बेग (कॅप्टन आणि विकेटकीपर), शमिल हुसैन, शाहजैब खान, अझान अवेस, मोहम्मद जीशान, मोहम्मद रियाझुल्ला, तय्यब आरिफ, अराफत मिन्हास, अली असफंद, अमीर हसन आणि उबेद शाह.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कॅप्टन), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, रुद्र पटेल, मुशीर खान, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी आणि नमन तिवारी.