VIDEO | वादग्रस्त रनआऊट| तुम्हीच सांगा चूक बॉलरची की बॅट्समनची?

| Updated on: Jan 20, 2023 | 8:24 PM

अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत 18 जानेवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला वादग्रस्तरित्या रनआऊट दिल्याने एकच चर्चा सुरु आहे.

VIDEO | वादग्रस्त रनआऊट| तुम्हीच सांगा चूक बॉलरची की बॅट्समनची?
Follow us on

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेत अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आतापर्यंत या स्पर्धेत फलंदाज-गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केलीय. या स्पर्धेत 18 जानेवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला फलंदाजाला वादग्रस्तरित्या रनआऊट देण्यात आलं. त्यानंतर हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ऑस्ट्रेलियाची लुसी हॅमिल्टनला रनआऊट दिल्याने नाराजीचं वातावरण आहे. तसंच लुसीला चुकीच्या पद्धतीने रनआऊट दिल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

नक्की काय झालं?

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरु होती. श्रीलंककेडून 19 वी ओव्हर टाकायला रश्मी नेत्रांजली आली. या ओव्हरमध्ये एमी स्मिथने जोरदार शॉट मारला. या फटक्यावर एमी आणि लुसीने 1 धाव घेतली. मात्र लुसीला दुसरी धावही घ्यायची होती. त्यासाठी लुसीने नॉन स्ट्राईक एंड सोडला. मात्र दुसरी रन होणार नाही हे तिच्या लक्षात आलं. त्यामुळे लुसी होती तिथेच थांबली. तेवढ्या दुलंगा दिसनायकेने बाउंड्री लाईनवरुन डायरेक्ट थ्रो केला.

हे सुद्धा वाचा

या दरम्यान हॅमिल्नटनने क्रीजमध्ये परत येण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र बॉलर नेत्रांजली मध्येच येऊन धडकली. त्यामुळे हॅमिलन्टन क्रीजपर्यंत पोहचू शकली नाही. या दरम्यान दिसनायकेचा डायरेक्ट थ्रो आला आणि हॅमिल्टन रनआऊट झाली. पंचांनी पण श्रीलंकेच्या बाजूने निर्णय दिला.

वादग्रस्त रनआऊट


हॅमिल्टनला रनआऊट द्यायला नको होतं. गोलंदाजाच्या धडकेमुळे ती क्रीझमध्ये पोहचू शकली नाही. हॅमिल्टनला चुकीच्या पद्धतीने आऊट देण्यात आलं. अशा काही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सामन्याचा धावता आढावा

दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाने या सामन्यात श्रीलंकेवर 108 धावांनी दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने पहिले बॅटिंग करताना श्रीलंकेला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं. मात्र श्रीलंकेचा डाव 51 धावांवर 13 ओव्हरमध्ये आटोपला.