मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. भारताने एकही सामना न गमवता अंतिम फेरी गाठली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजविरुद्धचा एकमेव सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर सर्व सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. त्यामुळे अंतिम भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. भारताने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 9 वेळा धडक मारली आहे. 2000, 2006, 2008, 2012, 2016, 2018, 2020, 2022, 2024 या वर्षात अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाने सहावेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. 1998, 2002, 2010, 2012 2018 आणि 2024 साली अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 5 वेळा विजय, तर तीन वेळा पराभवाचं तोंड पाहिलं आहे. आता भारताकडे सहाव्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत सहाव्यांदा धडक मारली आहे. यात 3 वेळा विजय, तर 2 पराभवाचं तोंड पाहिलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिाय 2012 आणि 2018 मध्ये अंतिम फेरीत भिडले होते. दोन्ही वेळा भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. आता तिसऱ्यांदा भारत ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही भारत ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचं स्वप्न भंग केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही देश अंडर 19 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. आता या सामन्यात कोण बाजी मारतो? याची उत्सुकता आहे.
भारत अंडर 19 संघ: आदर्श सिंग, प्रियांशु मोलिया, रुद्र पटेल, सचिन धस, उदय सहारन (कर्णधार), आर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, अरवेली अवनिश राव (विकेटकीपर), इननेश महाजन (विकेटकीपर), आराध्या शुक्ला, धनुष गोवडा, मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे
ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघ: हॅरी डिक्सन, हरजस सिंग, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), ऑलिव्हर पीक, लचलान एटकेन (डब्ल्यू), राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा, महली बियर्डमन, कॅलम विडलर, रायन हिक्स, टॉम कॅम्पबेल, टॉम स्ट्रेकर, एडन ओ कॉनर, कोरी वॉस्ले