UP vs MI : हरमनप्रीत कौर हीची शानदार फिफ्टी, मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय, यूपीवर 8 विकेट्सने विजय

| Updated on: Mar 12, 2023 | 11:38 PM

वूमन्स प्रीमिअर लीगमधील स्पर्धेमध्ये मुंबई इंडिअन्स संघाने सलग चौथा विजय मिळवला आहे.

UP vs MI : हरमनप्रीत कौर हीची शानदार फिफ्टी, मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय, यूपीवर 8 विकेट्सने विजय
Follow us on

मुंबई : वूमन्स प्रीमिअर लीगमधील स्पर्धेमध्ये मुंबई इंडिअन्स संघाने सलग चौथा विजय मिळवला आहे. यूपी वॉरिअर्स संघाचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. यूपी वॉरिअर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 159 धावा केल्या होत्या. 18 व्या ओव्हरमध्येच हे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण करत मुंबई संघाची स्पर्धेतील विजयाची एक्सप्रेस सुसाट सुटली आहे. लक्ष्याच पाठलाग करताना हरमनप्रीत कौरने सर्वाधिक नाबाद 53 धावांची खेळी केली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या यूपी वॉरिअर्स संघाकडून एलिसा हिलीने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. देविक वैद्य 6 धावा, किरण नवगिरे 17 धावा, सिमरन शेख नाबाद 9 धावा, सोफी एक्लेस्टोन 1 धाव आणि दीप्ती शर्मा 7 धावा यांना मोठी खेळी करता आली नाही. एलिसा हिली आणि ताहलिया मॅकग्राने 50 धावा या दोघींच्या अर्धशतकाच्या जोरावर यूपी वॉरिअर्सने 159 धावांचा टप्पा गाठला होता.

मुंबईकडून सलामीला उतरलेल्या हेली मॅथ्यूजला (12 धावा) आज मोठी खेळी साकारता आली नाही. मात्र यास्तिका भाटिया 47 धावा, नॅट सायव्हर-ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेल्या तोडफोड फलंदाजीच्या जोरावर मुंबईने हा सामना आपल्या खिशात घातला आणि स्पर्धेतील आपला सलग चौथा विजय नोंदवला.

हरमनप्रीत कौरने आजच्या सामन्यातही तडाखेबंद अर्धशतक ठोकलं. 33 चेंडूत 53 धावा केल्या यामध्ये 9 चौकार आणि 1 षटकार खेचला. तर नॅट सायव्हर-ब्रंटनेही आक्रमक पवित्रा घेतलेला कायम ठेवत 31 चेंडूत 45 धावा केला. यामध्ये 6 चौकार आणि 1 षटकारचा समावेश होता. सलामीला आलेल्या यास्तिकाने आपल्या 47 धावांच्या खेळीमध्ये 8 चौकार आणि 1 षटकार मारला.

दरम्यान, मुंबई संघाने स्पर्धेतील चौथा विजय नोंदवत गुणतालिकेतील आपलं पहिलं स्थान आणखी भक्कम केलं आहे. मुंबई 8 गुणांसह 3.524 च्या रनरेटने पहिल्या स्थानावर विराजमान आहे.