यूएसएने कॅनडावर टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या सलामी सामन्यात 7 विकेट्सने दमदार विजय मिळवला. कॅनडाने यूएसला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. यूएएसची या आव्हानाचा पाठलाग करताना 2 बाद 42 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर आरोन जोन्स आणि अँड्रिज गॉस या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीमुळे यूएसएचा विजय सोपा झाला. आरोन आणि अँड्रिज या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली.
त्यानंतर अँड्रिज गॉस 65 धावांवर बाद झाला. मात्र आरोन जोन्स याने अखेरपर्यंत नाबाद राहत सिक्स खेचून यूएसएला विजयी केलं. आरोन जोन्स हा यूएसएच्या विजयाचा खरा नायक ठरला. आरोन जोन्स याने नाबाद 94 धावांची विजयी खेळी साकारली. जोन्सने यूएसएसाठी सर्वाधिक धावांची खेळी केली. जोन्सने 235 च्या स्ट्राईक रेटने 40 चेंडूच्या मदतीने 94 धावांची खेळी केली. जोन्सने या खेळीत 10 षटकार आणि 4 चौकार ठोकले. जोन्सने अर्थात 14 चेंडूत 76 धावा केल्या. जोन्सने केलेल्या या खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
यूएसएचा पुढील सामना हा 6 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. पाकिस्तान हा वर्ल्ड कप मोहिमेतील पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याआधी जोन्सची तडाखेदार खेळी पाहून पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर यूएसए विरुद्धच्या सामन्यात जोन्सला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
आरोन जोन्स मॅन ऑफ द मॅचचा मानकरी
Our Player of the Match for the opener of the @ICC @T20WorldCup against Canada! 🤩🏆#T20WorldCup | #USAvCAN | #WeAreUSACricket 🇺🇸 pic.twitter.com/khKxRAWdX6
— USA Cricket (@usacricket) June 2, 2024
यूएसए प्लेईंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, अली खान आणि सौरभ नेत्रवाळकर.
कॅनडा प्लेइंग ईलेव्हन: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस कर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), दिलप्रीत सिंग, निखिल दत्ता, डिलन हेलिगर, कलीम साना आणि जेरेमी गॉर्डन.