USA vs IND: सूर्या-शिवमची निर्णायक भागीदारी, यूएसवर 7 विकेट्सने विजय, टीम इंडियाची Super 8 मध्ये धडक

| Updated on: Jun 12, 2024 | 11:52 PM

USA vs IND Match Result : यूएसएने टीम इंडियाला विजयाासाठी 111 धावांचं आव्हान दिलं होतं.

USA vs IND: सूर्या-शिवमची निर्णायक भागीदारी, यूएसवर 7 विकेट्सने विजय, टीम इंडियाची Super 8 मध्ये धडक
shivam dube and suryakumar yadav
Follow us on

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 25 व्या सामन्यात यूनायटेड स्टेट्स टीमवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. यूएसएने टीम इंडियाला विजयासाठी 111 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 18.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे ही जोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह सुपर 8 मध्ये धडक मारली आहे.

टीम इंडियाची 111 धावांचा पाठलाग करताना नाजूक स्थिती झाली होती. मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर याने विराट कोहली याला गोल्डन डक आऊट केलं. तर सौरभने रोहित शर्मा यालाही 3 धावांवर बाद करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ऋषभ 20 बॉलमध्ये 18 धावा करुन माघारी परतला. ऋषभ आऊट झाल्यानंतर शिवम दुबे मैदानात आला.

शिवम दुबे आणि आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी 67 बॉलमध्ये 67 धावांची नाबाद भागीदारी केली. शिवम आणि सूर्या या दोघांनी या भागीदारीदरम्यान एकेरी दुहेरी धावांसह संधी मिळाले तेव्हा मोठे फेटके मारले आणि टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. सूर्याने 49 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 50 रन्स केल्या. तर शिवमने 35 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह नाबाद 31 धावा केल्या. यूएसएकडून सौरभ नेत्रवाळकर याने 2 विकेट्स घेतल्या. तर अली खान याने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाची विजयी हॅट्रिक

युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.