भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी 12 जून रोजी यजमान संघ यूएसएवर 7 विकेट्सने मात करत आपला सलग तिसरा विजय मिळवला. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 111 धावांचं आव्हान हे 3 विकेट्स गमावून 10 बॉलआधी पूर्ण केलं. टीम इंडियाने 18.2 ओव्हरमध्ये 3 बाद 111 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 50* आणि शिवम दुबे याने नाबाद 31 धावा केल्या. तर त्याआधी अर्शदीप सिंह याने 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे यूएसएला 110 धावांवर रोखण्यात यश आलं. अर्शदीपला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
टीम इंडिया या विजयी हॅट्रिकसह सुपर 8 मध्ये पोहचली आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडियाने सुपर 8 मध्ये पोहचणारी तिसरी टीम ठरली आहे. आता पुढील काही सामन्यांमध्ये उर्वरित 5 जागांसाठी एकूण 4 गटातील संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाच्या सुपर 8 मधील प्रवेशासह या फेरीतील सामनाही निश्चित झाला आहे. टीम इंडियाचा सुपर 8 मधील सामना हा आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.
दरम्यान टीम इंडिया आपल्या साखळी फेरीतील अखेरचा सामना हा कॅनडा विरुद्ध 15 जून रोजी खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया सुपर 8 राउंडला सुरुवात करणार आहे. टीम इंडिया सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना हा 24 जून रोजी डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लूसिया येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने
ICC has pre-decided the seeding for Super 8 stage ahead of the T20I World Cup so India will be A1 and Australia will be B2 [It doesn’t matter where they finish in group stage, they just need to qualify]
– So it’s IND vs AUS on June 24th. pic.twitter.com/TEV6lnLFYy
— Johns. (@CricCrazyJohns) June 12, 2024
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.