आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात ए ग्रुपमधील यूनायटेड स्टेटस विरुद्ध आयर्लंड आमनेसामने असणआर आहेत. मोनांक पटेल याच्याकडे यूएसएचं नेतृत्व आहे. तर पॉल स्टर्लिंग आयर्लंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे. यूएसएचा हा चौथा आणि आयर्लंडचा तिसरा सामना असणार आहे. यूएसए 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर आयर्लंडला अद्याप विजयाचं खातंही उघडता आलेलं नाही. यूएसएला हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये पोहचण्याची संधी आहे. तर आयर्लंड पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. अशात हा सामना निर्णायक ठरणार आहे. तसेच या सामन्याच्या निकालावर पाकिस्ताचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे पाकिस्तानचं या सामन्याच्या निकालाकडे लक्ष असणार आहे.
यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना शुक्रवारी 14 जून रोजी होणार आहे.
यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणार आहे.
यूएसए विरुद्ध आयर्लंड सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना मोबाईलवर फुकटात डिज्ने प्लस हॉट्स्टार एपवर पाहता येईल.
आयर्लंड टीम: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, क्रेग यंग, बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम आणि रॉस एडेअर.
युनायटेड स्टेट्स टीम: आरोन जोन्स (कॅप्टन), शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल आणि मिलिंद कुमार.