13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा पुन्हा धमाका, वनडे सामन्यात गोलंदाजांना धू धू धुतला

| Updated on: Dec 31, 2024 | 3:33 PM

विजय हजारे स्पर्धेत 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा तडका दिसला. कृणाल पांड्या कर्णधार असलेल्या बरोडा संघाला जोरदार हिसका दिला. पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळत गोलंदाजांची पिसं काढली. 42 चेंडूत 71 धावांची आक्रमक खेळी केली.

13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा पुन्हा धमाका, वनडे सामन्यात गोलंदाजांना धू धू धुतला
Follow us on

विजय हजारे स्पर्धेत बिहार आणि बरोडा हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बिहारच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बरोड्याने 49 षटकात सर्व गडी गमवून 277 धावांची खेळी केली आणि विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान बरोड्यासमोर गाठणं बिहारसाठी अवघड आहे. कारण अनुभवी कृणाल पांड्याच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करत आहे. विष्णु सोळंकीच्या शतकी खेळीच्या जोरावर बरोड्याने 277 धावांचं लक्ष गाठलं. त्याच्याशिवाय इतर फलंदाज काही मोठी कामगिरी करू शकले नाहीत. बरोड्याने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी कुमार रजनीश आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानात उतरली होती. वैभव सूर्यवंशीने मोठं आव्हान पाहून आक्रमक सुरुवात केली.

वैभव सूर्यवंशीने 42 चेंडूंचा सामना केला आणि 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 71 धावांची खेळी केली. त्यने 169.05 च्या स्ट्राईक रेटने बरोड्याच्या गोलंदाजांना धुतलं. वैभव सूर्यवंशीची ही खेळी राजस्थान रॉयल्स संघासाठी सुखद धक्का देणारी आहे. कारण आयपीएल लिलावात कोट्यवधींची बोली लावून 13 वर्षीय वैभवला संघात घेतलं आहे. यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंगसाठी राजस्थानला एक चांगला पर्याय मिळाला आहे. तसेच राहुल द्रविडच्या देखरेखीत त्याल्या फलंदाजीला आणखी चांगले पैलू पडतील यात शंका नाही.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या गट ई मध्ये असलेला बरोड्याने तीन पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर बिहारने तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवला असून बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी गाडी विजयाच्या रुळावर आणणं आवश्यक आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बिहार (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, मंगल माहूर, हर्ष राज, साकिबुल गनी (कर्णधार), बिपिन सौरभ (विकेटकीपर), कुमार रजनीश, रघुवेंद्र प्रताप सिंग, आमोद यादव, सूरज कश्यप, हिमांशू सिंग, हिमांशू वर्मा.

बडोदा (प्लेइंग इलेव्हन): महेश पिठिया, शिवालिक शर्मा, विष्णू सोळंकी (विकेटकीपर), कृणाल पंड्या (कर्णधार), भानू पानिया, राज लिंबानी, भार्गव भट्ट, अतित शेठ, शाश्वत रावत, निनाद अश्विनकुमार रथवा, लक्षित टोकसिया