मुंबई | क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या एका युवा फलंदाजाने इतिहास रचला आहे. या युवा फलंदाजाने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स फटकावत अविस्मरणीय अशी कामगिरी केली आहे. वामशी क्रिष्णा अशा या फलंदाजाचं नाव आहे. वामशी याने कर्नल सी के नायडू स्पर्धेत रेल्वे विरुद्ध हा कारनामा केला. वामशीने एका ओव्हरमध्ये फटकावलेल्या 6 सिक्सचा व्हीडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हीडिओ आता जोरदार व्हायरल झाला आहे. तसेच वामशी क्रिष्णा याच्या या कारनाम्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा युवराज सिंहच्या 6 सिक्सची आठवण झालीय.
आंध्रचा ओपनर बॅट्समन वामशी क्रिष्णा याने रेल्वे टीमचा स्पिनर दमनदीप सिंह याच्या बॉलिंगवर हा धमाका केला. वामशीने रेल्वे विरुद्ध या 6 षटकारांच्या जोरावर झंझावाती अशी शतकी खेळी केली. वामशीने 64 बॉलमध्ये 110 धावा केल्या. वामशीने या खेळीत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वामशीने रेल्वेच्या गोलंदाजांना झोडून काढला. वामशीच्या या खेळीमध्ये 9 फोर आणि 10 सिक्सचा समावेश होता. मात्र त्यानंतर वामशीच्या या सुपरफास्ट खेळीला तौफीक उद्दीन याने ब्रेक लावला. तौफीकने वामशीला के टी मराठे याच्या हाती कॅच आऊट केलं.
एका ओव्हरमध्ये 6 सिक्स
𝟔 𝐒𝐈𝐗𝐄𝐒 𝐢𝐧 𝐚𝐧 𝐨𝐯𝐞𝐫 𝐀𝐥𝐞𝐫𝐭! 🚨
Vamshhi Krrishna of Andhra hit 6 sixes in an over off Railways spinner Damandeep Singh on his way to a blistering 64-ball 110 in the Col C K Nayudu Trophy in Kadapa.
Relive 📽️ those monstrous hits 🔽@IDFCFIRSTBank | #CKNayudu pic.twitter.com/MTlQWqUuKP
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 21, 2024
दरम्यान आतापर्यंत क्रिकेट इतिहासात एका ओव्हरमध्ये मोजक्याच फलंदाजांना जमलं आहे. आतापर्यंत अशी कामगिरी हर्षल गिब्स, जसकरण मल्होत्रा, युवराज सिंग, कायरन पोलार्ड, गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, ली जर्मन, थिसारा परेरा, ऋतुराज गायकवाड, रोज व्हाइटली, लिओ कार्टर आणि हजरतुल्ला झझाई या फलंदाजांनी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स खेचण्याचा कारनामा केला आहे.
आंध प्रदेश प्लेईंग ईलेव्हन | वामसी कृष्णा (कर्णधार), के निखिलेश्वर, वामशी क्रिष्णा (विकेटकीपर), एम हेमंत रेड्डी, ई धरणी कुमार, एस वेंकट राहुल, वासू, त्रिपुराण विजय, डीव्हीएस श्रीराम, बी संतोष कुमार आणि एम चेन्ना रेड्डी.
रेल्वे प्लेईंग ईलेव्हन | पूर्णांक त्यागी (कॅप्टन), अथर्व करुळकर (विकेटकीपर), अंश यादव, के टी मराठे, रवी सिंग, अंचित यादव, शिवम गौतम, तौफिक उद्दीन, दमनदीप सिंग, एसआर कुमार आणि एम डी जयस्वाल.