Cricket | वन मॅन शो | गोलंदाजाचा कारनामा, 10 विकेट्स घेत रचला इतिहास

| Updated on: Apr 29, 2023 | 11:05 PM

आयपीएल दरम्यान एका युवा गोलंदाजाने धमाका केलाय. या एकट्या गोलंदाजाने 10 विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाला जेरीस आणत ऑलआऊट केलं.

Cricket | वन मॅन शो | गोलंदाजाचा कारनामा, 10 विकेट्स घेत रचला इतिहास
Follow us on

मुंबई | क्रिकेट विश्वात सध्या आयपीएल 16 व्या मोसमाची एकच चर्चा सुरु आहे. या 16 व्या मोसमातील पहिला टप्पा यशस्वी पूर्ण झाला आहे. काही संघांनी सातत्याने सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या पाचात स्थान मिळवलंय. तर काही संघांना विजयात सातत्य राखण्यात अपयश आल्याने त्यांना झगडावं लागतंय. पहिला टप्पा संपल्याने आता प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी एक एक सामना हा महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे आता टॉप 5 मधील संघांचा झटपट सामने जिंकून आयपीएल क्वालिफायरसाठी पात्र ठरण्यासाठी धडपड सुरु आहे. या दरम्यान दुसऱ्या बाजूला मात्र एका युवा गोलंदाजांना ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या पठ्ठ्याने एका डावात 10 च्या 10 विकेट्स घेत आपली दखल घेण्यास भाग पाडलं.

प्रत्येक गोलंदाजाचं आपल्या कारकीर्दीत हॅटट्रिक घेण्याचं स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. मात्र त्या पलिकडे एका डावात 10 विकेट्स घेणं ही जवळपास दुर्मिळ बाब. एका डावात एकाच गोलंदाजाने 10 च्या 10 विकेट्स घेणं अशा घटना क्वचितच घडल्या आहेत. मुळचा भारतीय मात्र न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या अझाज पटेल यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध 2021 मध्ये एकाच डावात 10 विकेट्स घेत इतिहास रचला.

मेहुल शेगमवार याची ऐतिहासिक कामगिरी

आता त्यानंतर एका युवा गोलंदाजानेही अशीच कामगिरी केलीय. चंद्रपूर जिल्हा क्रिकेट टीमचा फिरकी गोलंदाज मेहुल शेगमवार या स्पिनरने 10 विकेट्स घेतल्या. विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत चंद्रपूर विरुद्ध गोंदिया यांच्यात आमनासामना झाला. मेहुलने गोंदिया विरुद्ध अवघ्या 22 धावांच्या मोबदल्यात पूर्ण संघाला तंबूत पाठवलं. मेहुलने 7.1 ओव्हरमध्ये 22 रन्सच्या मोबदल्यात या 10 विकेट्स पटकावल्या.

विदर्भाच्या खेळाडूंची आयपीएलमध्ये छाप

दरम्यान आयपीएलच्या 16 व्या हंगामात जितेश शर्मा आणि अथर्व तायडे या विदर्भाच्या पोट्ट्यांनी आपली छाप उमटवली आहे. पंजाब किंग्स टीमकडून खेळणाऱ्या अथर्व तायडे याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 28 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात एकाकी झुंज दिली. लखनऊने पंजाबल विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबनेही चांगली झुंज देत 201 धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये अथर्व तायडे याने 36 बॉलमध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 66 धावा केल्या.