12 चौकार आणि 4 षटकार, केकेआरच्या माजी खेळाडूचं विस्फोटक शतक, पाहा व्हीडिओ

| Updated on: Jan 09, 2025 | 8:20 PM

Vijay Hazare Trophy : आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी एकमेव सामना खेळणाऱ्या फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफीत विस्फोटक शतकी खेळी केली आहे. पाहा व्हीडिओ.

12 चौकार आणि 4 षटकार, केकेआरच्या माजी खेळाडूचं विस्फोटक शतक, पाहा व्हीडिओ
abhijeet tomar century rajasthan vs tamil nadu vht
Follow us on

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सध्या विजय हजारे ट्रॉफीचा थरार सुरु आहे. राजस्थानचा फलंदाज अभिजीत तोमर याने तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. अभिजीत तोमर याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर आणि इतर सहकाऱ्यांच्या धावांच्या मदतीने राजस्थानने 267 धावांपर्यंत मजल मारली. तसेच राजस्थानने त्यानंतर या 267 धावांचा यशस्वी बचाव करत क्वार्टर फायनलमध्येही धडक दिली. राजस्थानने रंगतदार झालेल्या या सामन्यात तामिळनाडूला 47.1 ओव्हरमध्ये 248 धावांवर गुंडाळून 19 धावांनी विजय मिळवला.

तामिळनाडूने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अभिजीत तोमर सलामी आला. मात्र दुसरा ओपनर सचिन यादव हा 27 बॉलमध्ये अवघ्या 4 रन्स करुन आऊट झाला. मात्र त्यानंतर अभिजीतने कॅप्टन महिपाल लोमरुर यासह दुसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी करत राजस्थानला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 160 धावांची कडक भागीदारी केली.

तोमरने 125 बॉलमध्ये 111 धावा केल्या. अभिजीत तोमर याने 16 बॉलमध्ये चौकार आणि षटकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. अभिजीतने या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकार लगावले. अभिजीतच्या लिस्ट ए कारकीर्दीतील हे चौथं शतक ठरलं.

केकेआरकडून एका सामन्यात प्रतिनिधित्व

दरम्यान अभिजीतने केकेआरचं एका सामन्यात प्रतिनिधित्व केलंय. अभिजीतने 18 मे 2022 रोजी त्या एकमेव सामन्यात लखनऊ विरुद्ध 8 चेंडूत 4 धावा केल्या होत्या. अभिजीतला मोहसिन खान याने केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं होतं. मात्र त्यानंतर केकेआरने अभिजीतला करारमुक्त केलं होतं. अभिजीत सध्या कोणत्याही संघासह करारबद्ध नाही.

अभिजीत तोमरची शतकी खेळी

तामिळनाडू प्लेइंग ईलेव्हन : आर साई किशोर (कर्णधार), तुषार रहेजा, एन जगदीसन (विकेटकीपर), बूपती कुमार, बाबा इंद्रजीथ, संजय यादव, विजय शंकर, मोहम्मद अली, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि त्रिलोक नाग.

राजस्थान प्लेइंग ईलेव्हन : महिपाल लोमरोर (कर्णधार), अभिजीत तोमर, सचिन यादव, कार्तिक शर्मा (विकेटकीपर), दीपक हुडा, समरपीत ​​जोशी, अमन सिंग शेखावत, मानव सुथार, कुकना अजय सिंग, खलील अहमद आणि अनिकेत चौधरी.