विजय हजारे ट्रॉफीतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात विदर्भाने महाराष्ट्राला 381 धावांचं आव्हान दिलं आहे. विदर्भाने 50 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 380 धावांचा डोंगर उभा केला. विदर्भासाठी दोघांनी शतकी खेळी केली. तर दोघांनी अर्धशतकं करत फिनिशिंग टच दिला. ध्रुव शोरी आणि यश राठोड या दोघांनी शतक झळकावलं. तर कॅप्टन करुण नायर आणि जितेश शर्मा या दोघांनी अर्धशतकी खेळी करत विदर्भाला 380 धावांपर्यंत पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. आता महाराष्ट्र टीम हे आव्हान पूर्ण करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
महाराष्ट्रने टॉस जिंकून विदर्भाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विदर्भाने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. ध्रुव शोरी आणि यश राठोड या सलामी जोडीने द्विशतकी भागीदारी करत विदर्भाला अफलातून सुरुवात करुन दिली. यश आणि ध्रुव या दोघांनी 224 धावांची ओपनिंग पार्टनरशीप केली. त्यानंतर यश राठोड आऊट झाला. यशने 101 बॉलमध्ये 14 फोर आणि 1 सिक्ससह 116 रन्स केल्या. यशमागोमाग काही षटकांनंतर ध्रुवही आऊट झाला. ध्रुवने 120 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकारासह 114 धावांचं योगदान दिलं.
सलामी जोडी माघारी परतल्यानंतर कर्णधार करुण नायर आणि जितेश शर्मा या दोघांनी स्फोटक खेळी करत विदर्भाला 300 पार पोहचवलं. करुण आणि जितेश या दोघांनी चौकार षटकारांची बरसात करत महाराष्ट्रच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. करुण आणि जितेश या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची स्फोटक भागीदारी केली. त्यानंतर जितेश शर्मा आऊट झाला. जितेशने 33 बॉलमध्ये 154.55 च्या स्ट्राईक रेटने 3 सिक्स आणि 3 फोरसह 51 रन्स केल्या. मात्र करुणने दुसऱ्या बाजूने स्फोटक खेळी सुरुच ठेवली. करुणने शेवटपर्यंत फटकेबाजी केली. करुणने 44 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 200 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 88 धावा केल्या. तर शुबम पांडे 5 धावांवर नाबाद परतला. महाराष्ट्रकडून मुकेश चौधरी याने 2 विकेट्स घेतल्या. तर सत्यजीत बच्छावने एक विकेट मिळवली.
विदर्भाची स्फोटक फलंदाजी, महाराष्ट्रसमोर 381 धावांचं आव्हान
Vidarbha have posted 380/3!
1⃣1⃣4⃣ for Dhruv Shorey
1⃣1⃣6⃣ for Yash Rathod
8⃣8⃣* for Karun Nair
5⃣1⃣ for Jitesh Sharma2⃣ wickets for Mukesh Choudhary
1⃣ for Satyajeet Bachhav#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBankScorecard ▶️ https://t.co/AW5jmfoiE1 pic.twitter.com/46yb60uy8V
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 16, 2025
महाराष्ट्र प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, अझीम काझी, निखिल नाईक (विकेटीपर), सत्यजीत बच्छाव, मुकेश चौधरी, रजनीश गुरबानी आआमि प्रदीप दधे.
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : करुण नायर (कर्णधार), ध्रुव शोरे, यश राठोड, अपूर्व वानखडे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शुभम दुबे, हर्ष दुबे, नचिकेत भुते, पार्थ रेखाडे, यश ठाकूर आणि दर्शन नळकांडे.