देशांतर्ग क्रिकेटमधील प्रतिष्ठेची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक विक्रम झालेत. आता 11 जानेवारीला एका 19 वर्षीय युवा फलंदाजाने धमाका केला आहे. सोलापूरच्या युवा अर्शीन कुलकर्णी याने पदार्पणातील सामन्यातच शतकी खेळी केली आहे. अर्शीनने महाराष्ट्रकडून पंजाबविरुद्ध लिस्ट ए क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. अर्शीनने या क्वार्टर फायलनमधील सामन्यात धमाकेदार खेळी करत महाराष्ट्रला एक भक्कम अशी धावासंख्या उभारुन देण्यात निर्णायक भूमिका बजावली. मात्र अर्शीनला या शतकी खेळी दरम्यान एकही शतक झळकावता आलं नाही.
अर्शीनने पंजाबविरुद्ध शतकी खेळी केली. अर्शीनने त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक करण्याचा बहुमान मिळवला. अर्शीनने संथ सुरुवात केली मात्र शतक करत त्याने संघासाठी मोलाची भूमिका बजावली. अर्शीनने 129 चेंडूत शतक पूर्ण केलं. अर्शीनने 78 च्या स्ट्राईक रेटने 137 चेंडूत 107 धावा केल्या. अर्शीनच्या या खेळीच्या जोरावर महाराष्ट्रला 50 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 275 धावांपर्यंत मजल मारता आली.
अर्शीनने या शतकी खेळीत एकूण 14 चौकार लगावले. मात्र अर्शीनला या खेळीत एकही सिक्स ठोकता आला नाही. अर्शीन 45 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला आणि मैदानाबाहेर गेला.
अर्शीन कुलकर्णीचा शतकी तडाखा
A special first on debut 👏👏
Arshin Kulkarni brings up his 💯 on List A debut 👌👌
A gritty knock under pressure 💪#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/eTrCnJbd5H pic.twitter.com/Ase7bS54Ka
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 11, 2025
दरम्यान महाराष्ट्रने हा सामना 70 धावांनी जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली. महाराष्ट्रने विजयासाठी दिलेल्या 276 धावांच्या प्रत्युत्तरात पंजाबचा डाव हा 44.4 ओव्हरमध्ये 205 धावाच करता आल्या. शतक करणाऱ्या अर्शीन कुलकर्णी याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
महाराष्ट्र प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, अझीम काझी, निखिल नाईक (विकेटकीपर), सत्यजीत बच्छाव, रजनीश गुरबानी, मुकेश चौधरी आणि प्रदीप दधे.
पंजाब प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, अनमोलप्रीत सिंग, नेहल वढेरा, नमन धीर, अनमोल मल्होत्रा (विकेटकीपर), रमनदीप सिंग, सनवीर सिंग, बलतेज सिंग, अर्शदीप सिंग आणि रघु शर्मा.