Vijay Hazare Trophy: मुंबईची विजयी हॅटट्रिक, सौराष्ट्रचा 5 विकेट्सने धुव्वा, आयुष म्हात्रेचं स्फोटक शतक

| Updated on: Jan 05, 2025 | 6:54 PM

Mumbai vs Saurashtra : आयुष म्हात्रे याच्या स्फोटक 148 धावांच्या खेळीच्या मदतीने मुंबईने विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. मुंबईने सौराष्ट्रकडून विजयासाठी मिळालेलं 290 धावांचं आव्हान हे 46 ओव्हरमध्येच 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. शतकवीर आयुष म्हात्रे 'सामनावीर' पुरस्काराचा मानकरी ठरला.

Vijay Hazare Trophy: मुंबईची विजयी हॅटट्रिक, सौराष्ट्रचा 5 विकेट्सने धुव्वा, आयुष म्हात्रेचं स्फोटक शतक
Ayush Mhatre Man Of The Match
Image Credit source: Bcci Domestic X Acccount
Follow us on

मुंबई क्रिकेट टीमने विजयी हजारे ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेत श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात विजयी हॅटट्रिक केली आहे. मुंबईने सी ग्रुपमधील राउंड 7 मॅचमध्ये सौराष्ट्राचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला आणि सलग तिसरा विजय साजरा केला. सौराष्ट्रने मुंबईला विजयासाठी 290 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 24 बॉल राखून पूर्ण केलं. मुंबईने 46 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 290 धावा केल्या. मुंबईचा 17 वर्षीय आयुष म्हात्रे हा विजयाचा शिल्पकार ठरला. तर इतर फलंदाजांनी विजयात योगदान दिलं.

मुंबईसाठी आयुष म्हात्रे याने 93 बॉलमध्ये 9 सिक्स आणि 13 फोरसह 159.14 च्या स्ट्राईक रेटने 148 धावांची स्फोटक शतकी खेळी केली. आयुषचं हे 3 सामन्यांमधील दुसरं शतक ठरलं. आयुषच्या या शतकामुळे मुंबईच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. आयुष व्यतिरिक्त इतर 6 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठत मुंबईच्या विजयात योगदान दिलं. जय बिस्टा याने 45 धावा केल्या. प्रसाद पवार याने 30 तर सूर्यांश शेडगेने 20 धावा जोडल्या. सिद्धेश लाडने 14 धावा केल्या. तर अर्थव अंकोलेकर आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या जोडीने मुंबईला विजयापर्यंत पोहचवलं. अर्थव आणि श्रेयस दोघेही नाबाद परतले. अथर्वने 16 तर श्रेयसने 13 धावा केल्या. सौराष्ट्रकडून कॅप्टन जयदेव उनाडकट याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर धर्मेंदसिंह जडेजा, चिराग जानी आणि प्रणव कारिया या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

मुंबईचा एकूण पाचवा आणि सलग तिसरा विजय

दरम्यान मुंबईचा हा सलग तिसरा आणि एकूण पाचवा विजय ठरला. मुंबईने या स्पर्धेतील एकूण 7 पैकी 5 सामने जिंकले. कर्नाटकाने मुंबईवर 7 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली. मुंबईने त्यानंतर हैदराबाद आणि अरुणाचल प्रदेशवर विजय मिळवला. चौथ्या सामन्यात पंजाबने मुंबईवर मात केली. त्यानंतर मुंबईने नागालँड, पुद्देचरी आणि त्यानंतर आता सौराष्ट्रवर विजय मिळवला.

हे सुद्धा वाचा

मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, प्रसाद पवार (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकुर, जय गोकुळ बिस्ता, हर्ष तन्ना आणि रॉयस्टन डायस.

सौराष्ट्र प्लेइंग इलेव्हन : जयदेव उनाडकट (कर्णधार), हार्विक देसाई (विकेटकीपर), जय गोहिल, अंकुर पनवार, चिराग जानी, विश्वराज जडेजा, अर्पित वसावडा, धर्मेंद्रसिंह जडेजा, पार्थ भुत, प्रणव कारिया आणि तरंग गोहेल.