नागपूर | रणजी ट्रॉफी 2024 चे दोन्ही अंतिम संघ ठरले आहेत. मुंबईने आधीच तामिळनाडूचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली होती. त्यानंतर आता 6 मार्चला विदर्भाने मध्यप्रदेशला 62 धावांनी पराभूत करत रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. विदर्भाला पाचव्या दिवशी विजयासाठी 4 विकेट्सची गरज होती. तर दुसऱ्या बाजूला मध्यप्रदेश विजयापासून अवघ्या 93 धावा दूर होता. त्यामुळे सामना चांगलाच रंगतदार स्थितीत पोहचला होता. सर्वांचंत पाचव्या दिवसाच्या खेळाकडे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र पाचव्या दिवशी विदर्भाने 4 विकेट्स घेत विजय मिळवला. आता रणजी ट्रॉफीसाठी मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
मध्यप्रदेशने पहिल्या डावात विदर्भावर कुरघोडी करत 82 धावांची आघाडी घेतली. तर विदर्भाने दुसऱ्या डावात यश राठोडच्या 141 धावांच्या जोरावर 402 पर्यंत मजल मारली. त्यामुळे मध्यप्रदेशला विजयासाठी 320 धावांच आव्हान मिळालं. मध्यप्रदेशच्या ओपनरने 94 धावांची तडाखेदार खेळी केली. तर हर्ष गवली याने 67 धावा जोडून मध्यप्रदेशच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. मात्र हे दोघेही आऊट झाल्यानंतर मध्यप्रदेशच्या इतर फलंदाजांना काही खास करता आलं नाही. मध्यप्रदेशचा डाव अशाप्रकारे 258 धावांवर आटोपला.
विदर्भाचं पहिल्या डावात 170 धावांवर पॅकअप झालं. मात्र त्यानंतर दुसऱ्या डावात यश राठोडच्या 141 धावांच्या खेळीमुळे विदर्भाने जोरदार मुसंडी मारत कमबॅक केलं. अक्षय वाडकर यानेही 77 धावांची खेळी केली. त्यानंतर विदर्भाच्या गोलंदाजांनी मध्यप्रदेशला गुंडाळून फायनलचं तिकीट कन्फर्म केलं.
दरम्यान आता मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात 10 मार्चपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. रणजी ट्ऱॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकाच राज्यातील 2 संघ पोहचण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी 1971 साली मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असा सामना झाला होता. तेव्हा मुंबईने बाजी मारली होती. आता 55 वर्षांनी पुन्हा एकदा एकाच राज्यातील संघ आमेनसामने आहेत.
विदर्भाची फायनलमध्ये धडक
𝐕𝐢𝐝𝐚𝐫𝐛𝐡𝐚 𝐚𝐫𝐞 𝐢𝐧𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 𝐟𝐢𝐧𝐚𝐥! 🙌🙌
They beat Madhya Pradesh by 62 runs in a tightly fought contest.
A terrific comeback from the Akshay Wadkar-led side 👌@IDFCFIRSTBank | #VIDvMP | #RanjiTrophy | #SF1
Scorecard ▶️ https://t.co/KsLiJPuqXr pic.twitter.com/YFY1kaO1x7
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 6, 2024
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, यश राठोड, करुण नायर, आदित्य सरवटे, यश ठाकुर, उमेश यादव, आदित्य ठाकरे, अक्षय वाखरे आणि अमन मोखाडे.
मध्यप्रदेश प्लेईंग ईलेव्हन | शुभम एस शर्मा (कर्णधार), यश दुबे, हिमांशू मंत्री (विकेटकीपर), हर्ष गवळी, व्यंकटेश अय्यर, सरांश जैन, अनुभव अग्रवाल, कुमार कार्तिकेय, आवेश खान, कुलवंत खेजरोलिया आणि सागर सोलंकी.