त्रिशतकी खेळी करणारा करूण नायरची कसोटी मोठी धावसंख्या होत असताना आठवण येते. कारण या यादीत विरेंद्र सेहवागनंतर त्याचंच नाव येतं. कसोटीत चांगली कामगिरी करूनही करूण नायरला हवी तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा भाग नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये करूण नायर जबरदस्त कामगिरी करत आहे. विजय हजारे ट्रॉफीत विदर्भाचं कर्णधारपद भूषवण्याऱ्या करूण नायरचं वादळ घोंगावत आहे. या स्पर्धेत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. करूण नायरने आतापर्यंत विजय हजारे स्पर्धेत 541 धावा केल्या आहेत. इतक्या धावा केल्यानंतर तो बाद झाला हे विशेष. करुण नायर लिस्ट ए क्रिकेटमध्ये बाद न होता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. करुण नायरने विजय हजारे स्प्रधेत पाच पैकी चार सामन्यात शतकी खेळी केली आहे. त्याने न्यूझीलंडच्या जेम्स फ्रँकलिनचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने 2010 मध्ये बाद न होता 527 धावा केल्या होत्या.
करूण नायरने पहिल्या सामन्यात जम्मू काश्मीरविरुद्ध नाबाद 122, दुसऱ्या सामन्यात छत्तीसगडविरुद्ध नाबाद 44, तिसऱ्या सामन्या चंदिगडविरुद्ध नाबाद 163, चौथ्या सामन्यात तामिळनाडूविरुद्ध नाबाद 111 आणि आता उत्तर प्रदेशविरुद्ध 112 धावांची खेळी केली. करूण नायर या स्पर्धेत पहिल्यांदाच उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात बाद झाला आहे. पण बाद झाला असला तरी त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. इतकंच काय तर विदर्भाला 8 विकेट विजय मिळवून देण्यात मोलाची साथ दिली आहे. दरम्यान, करूण नायर आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सकडून केळणार आहे. करुण नायरने महाराजा टी20 स्पर्धेत 56 च्या सरासरीने 560 धावा ठोकल्या होत्या.
करुण नायरने 2016 मध्ये टीम इंडियात पदार्पण केलं होतं. त्याने 6 कसोटी सामन्यांच्या 7 डावात 62.33 च्या सरासरीने 374 धावा केल्या होत्या. यात करूण नायरने एक त्रिशतक ठोकलं आहे. इंग्लंडविरुद्ध 303 धावांची खेली केली होती. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाळा येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मात्र त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही.