नवी दिल्ली : कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील बातम्या नेहमी चर्चेत असतात. या दोन खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये अनेकदा वाद होतात. हे देखील तुम्हाल माहित आहे. मात्र, सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. सोशल मीडिया साइट्सवर व्हायरल होत असलेले ते व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवून नेमकं काय चालू आहे. याविषयी माहिती देणार आहोत. तर दोन मित्रांमध्ये भांडणंही आहे का, याविषयी जाणून घ्या…
तिसऱ्या T20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका जिंकली. हैदराबादमध्ये खेळलेला हा सामना भारतानं गमावला असता तर मालिका गमावली असती पण तसं झालं नाही आणि याचं एक प्रमुख कारणही आहे.
कर्णधार रोहित शर्मानं विराटच्या पाठीवर थाप मारून त्याचं अभिनंदन केलं. त्यानंतर विराट कोहलीही आला आणि रोहित शर्माच्या शेजारी बसला आणि हार्दिक पांड्याने विजयी शॉट मारताच रोहित आणि विराट एकमेकांना मिठी मारताना आणि स्विंग करताना दिसले.
Few relationships became teammates to friends and few became friends to teammates.. that’s life, somethings just aren’t meant to be. #ViratKohli pic.twitter.com/aemsc8gKLM
— Kc (@Kohliception) September 26, 2022
काही मिनिटांतच हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल आणि चर्चा रंगली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
विराट कोहली फार काळ धावा करू शकला नाही. पण, विराट कोहली पुन्हा जुन्या रंगात परतला आहे. जो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यातही पाहायला मिळाला.
विराट आणि रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये अनेकदा मतभेद होतात. यामुळे या दोन खेळाडूंमध्ये वर्षानुवर्षे वाद सुरू असल्याच्या नुसत्या चर्चा असतात. विराटचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितला कर्णधारपद मिळाल्यावर या अफवेनं आणखी जोर पकडला पण तसे काही नव्हते.