नवी दिल्ली : मित्राला भेटायला गेला आणि अडकला, अशी अवस्था रोहित शर्मा याची (Rohit Sharma) झाली. अर्थातच रोहित हा दिग्गज क्रिकेटपटू आहे. त्यामुळे चाहत्यांची सारखी गर्दी त्याच्या जवळ असणारच. याही वेळी हाच प्रकार होता. पण, थोडं वेगळं काही घडलं. जे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा हा देशातील सर्वाधिक पसंतीचा क्रिकेटपटू आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. 15 ऑगस्टलाही असाच प्रकार घडला होता. खरंतर रोहित त्याच्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. हे लक्षात येताच रोहितचे हजारो चाहते रेस्टॉरंटबाहेर जमा झाले. प्रत्येकजण आपल्या स्टार क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी आतुर दिसत होता. दरम्यान, रोहितचा एक व्हिडीओ व्हायर होतोय, तो व्हिडीओ नेमका कशाचा आहे, हे जाणून घ्या…
Rohit’s kgf?@ImRo45 #RohitSharma?pic.twitter.com/AqGnqp4X05
हे सुद्धा वाचा— YAHYA V45 (@V45Yahya) August 16, 2022
रोहित रेस्टॉरंटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. पण, प्रचंड गर्दी पाहून त्याला आपला विचार बदलावा लागला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला परत आत पाठवले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांची एवढी गर्दी पाहून रोहितही अस्वस्थ झाला.
Indian Captain Rohit Sharma Spotted ?!!
Fans are waiting outside the hotel to see Rohit Sharma ❤️ pic.twitter.com/jANxsUco55— ROHIT TV™ (@rohittv_45) August 16, 2022
अलीकडेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजचा पाच T20 सामन्यांच्या मालिकेत पराभव केला. त्यानंतर संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे. आशिया चषकापूर्वी रोहितही ब्रेकवर आहे. मात्र, हा ब्रेक त्याच्यासाठी त्रासदायक ठरला. मुंबईतील ‘द टेबल’ रेस्टॉरंटमध्ये तो आपल्या मित्राला भेटायला गेला होता. काही वेळातच या रेस्टॉरंटबाहेर त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेला पोहोचला आहे. 18 ऑगस्टपासून दोन्ही देशांदरम्यान 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आशिया चषकासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे फिटनेस शिबिर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होणार आहे. येथे खेळाडूंना फिटनेस चाचणी द्यावी लागेल. यानंतर टीम इंडिया दुबईला रवाना होणार आहे. जिथे टीम इंडियाचे कॅम्प 2-3 दिवस चालणार आहे. आशिया चषकात भारताला 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.