नवी दिल्ली : सध्या ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) चांगलाच जोमात दिसतोय. तुम्ही म्हणाल मॅक्सवेल हा तुफानी फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातोय. त्यात मॅक्सवेल जोमात असण्याचा प्रश्नच नाही. तो कायमच जोरदार खेळी करतो आणि गोलंदाजांना घाम फोडतो. मात्र, या वेळेस त्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष असणार आहे. कारण, भारत (India) दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया टीमनं (Team Australia) सरावाला सुरुवात केला आहे. याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
भारत दैऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया टीमचा ग्लेन मॅक्सवेल हा तरबेज खेळाडू आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची महत्वाची कडी आहे किंवा महत्वाचा भाग आहे, असं म्हणावं लागेल. मॅक्सवेलची तयारी देखील पूर्ण झाल्याचं दिसतंय. पण, यातच मॅक्सवेलचा नवा अंदाज दिसून आला आहे. मॅक्सवेल हा उजव्या हातानं फलंदाजी करणारा असला तरी तो डाव्या हातानं फलंदाजी करताना दिसून आला. त्याचा हा व्हिडीओ तुम्ही पहाच. त्यानं नेमकं काय केलं हे तुम्हाला दिसून येईल.
Maxwell bats left-handed in the nets pic.twitter.com/g8pvMxwqXF
— Aritra Mukherjee (@aritram029) September 19, 2022
ऑस्ट्रेलिया युवा फलंदाज टीम डेव्हिडला पदार्पणाची संधी मिळू शकते. कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, डेव्हिडला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी तो उत्सुक आहे. डेव्हिडने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पण, हे सामने त्यानं सिंगापूरसाठी खेळले. त्याला भारताविरुद्ध संधी मिळाल्यास तो ऑस्ट्रेलियाकडून पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची टी-20 सीरीजची सुरुवात मोहालीत होईल. ही सीरिज 20 सप्टेंबरपासून सुरु होईल. तर दुसरा सामना हा 23 सप्टेंबरला नागपूर याठिकाणी होईल, तिसरा आणि शेवटचा सामना 25 सप्टेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.