विजय हजारे ट्रॉफी 2024-25 स्पर्धेत गोवा संघाने विजयाने सुरुवात केली. ओडिशाविरुद्धच्या सामन्यात गोव्याने 27 धावांनी विजय मिळवला. ओडिशाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात गोव्याने धडकेबाज सुरुवात केली.स्नेहल कौठणकर आणि इशान गाडेकर चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. स्नेहल कौठणकरने 67, तर इशान गाडेकरने 93 धावांची खेळी केली. कृष्णमूर्ती सिद्धार्थचं नशिब फुटकं निघालं आणि 37 धावांवर धावचीत झाला. त्यानंतर दर्शन मिसाळने 79, तर सुयश प्रभुदेसाईने नाबाद 74 धावांची खेळी केली. 50 षटकात गोव्याने 4 गडी गमवून 371 धावांचा डोंगर रचला आणि विजयासाठी 372 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना ओडिशानेही चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. आक्रमक पवित्रा पाहून सामना हातून जातो की काय अशी स्थिती होती. तेव्हा अर्जुन तेंडुलकरने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली.
अर्जुन तेंडुलकरला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. पण धावा रोखण्यासाठी त्याची मदत झाली. अर्जुन तेंडुलकरने 10 षटकं टाकत 61 धावा दिल्या आमइ 3 गडी बाद केले. तर शुभम तारीने 2, मोहित रेडकरने 2, तर दर्शन मिसाळ आणि दीपराज गावकरने प्रत्येकी एक गडी बाद केला. खरं तर ओडिशाचा संघ विजयाचा जवळ पोहोचला होता. ओडिशाने सर्व बाद 344 धावा केल्या. गोव्याला 27 धावांनी विजय मिळवला. पण ओडिशाने केलेल्या धावा पाहता जर विकेट झटपट मिळाल्या नसत्या तर चित्र वेगळं असू शकलं असतं. गोव्याचा पुढचा सामना हरियाणासोबत 23 डिसेंबरला होणार आहे. दुसरीकडे, अर्जुन तेंडुलकरवर आयपीएल लिलावात बोली लागली नव्हती पण बेस प्राईसवर मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतलं.
ओडिशा (प्लेइंग इलेव्हन): संदीप पटनाईक (कर्णधार), स्वस्तिक सामल, गौरव चौधरी, गोविंदा पोद्दार, कार्तिक बिस्वाल, अभिषेक राऊत, आशीर्वाद स्वेन (विकेटकीपर), देबब्रत प्रधान, राजेश मोहंती, जमाला महापात्रा, तरानी सा.
गोवा (प्लेइंग इलेव्हन): स्नेहल कौठणकर, इशान गाडेकर, दीपराज गावकर, सुयश प्रभुदेसाई, विकास सिंग, दर्शन मिसाळ (कर्णधार), कृष्णमूर्ती सिद्धार्थ (विकेटकीपर), फेलिक्स आलेमाओ, अर्जुन तेंडुलकर, मोहित रेडकर, शुभम तारी.