विजय हजारे ट्रॉफीत शाशवत रावतची शतकी खेळी व्यर्थ, कर्नाटकची बडोद्याला नमवून उपांत्य फेरीत धडक

| Updated on: Jan 11, 2025 | 6:22 PM

विजय हजारे स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटक आणि बडोदा यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात कर्नाटकने बडोद्यावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह कर्नाटकने उपांत्य फेरी गाठली आहे. आता उपांत्य फेरीत कोणाशी सामना होणार हे रविवारी स्पष्ट होईल.

विजय हजारे ट्रॉफीत शाशवत रावतची शतकी खेळी व्यर्थ, कर्नाटकची बडोद्याला नमवून उपांत्य फेरीत धडक
Follow us on

विजय हजारे स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटक आणि बडोदा हे संघ आमनेसामने आले होते. अतितटीच्या या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत थरार रंगला.अखेर कर्नाटक संघाने विजय मिळवला असून उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बडोद्याच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 281 धावा केल्या आणि विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना बडोद्याने कडवी झुंज दिली. शाशवत रावतने 126 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारत 104 धावा केल्या आणि विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. पण बडोद्याच्या शेपटाच्या फलंदाजांना विजयी धावसंख्या काही गाठता आली नाही. त्यामुळे पाच धावांनी निसटता पराभव झाला. बडोद्याचा संघ 49.5 षटकात सर्व गडी गमवून 276 धावा करू शकला. विजयासाठी 6 आणि धावा बरोबरीसाठी 5 धावांची गरज होती. पण ते काही झालं नाही. अखेर 5 पराभव मान्य करावा लागला.

कर्नाटककडून देवदत्त पडिक्कल याने झुंजार खेळ केली. 99 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 102 धावा केल्या. त्याने 103 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. त्याला अनिश केव्हीची उत्तम साथ मिळाली. त्याने 64 चेंडूत 52 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे कर्नाटकला 281 धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, कर्नाटककडून वासुकी कौशिकने 2, प्रसिद्ध कृष्णाने 2, अभिलाष शेट्टीने 2 आणि श्रेयस गोपाळने 2 गडीबाद केले. तर दोन खेळाडू रनआऊट झाले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कर्नाटक (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अनीश केव्ही, स्मरण रविचंद्रन, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), अभिनव मनोहर, हार्दिक राज, श्रेयस गोपाल, अभिलाष शेट्टी, वासुकी कौशिक, प्रसीद कृष्णा.

बडोदा (प्लेइंग इलेव्हन): शाश्वत रावत, निनाद अश्विनकुमार रथवा, अतित शेठ, शिवालिक शर्मा, कृणाल पंड्या (कर्णधार), विष्णू सोलंकी (विकेटकीपर), महेश पिठिया, भार्गव भट्ट, भानू पानिया, राज लिंबानी, लुकमान मेरीवाला