विजय हजारे स्पर्धेत रविवारी दोन उपांत्यपूर्व फेरीचे सामने, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Jan 11, 2025 | 9:27 PM

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या संघांनी उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. आता इतर दोन संघांसाठी उपांत्यपूर्व फेरीत दोन सामने होणार आहे. चला जाणून घेऊयात या सामन्यांबाबत

विजय हजारे स्पर्धेत रविवारी दोन उपांत्यपूर्व फेरीचे सामने, जाणून घ्या सर्वकाही
Follow us on

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शनिवारी झालेल्या दोन सामन्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रने बाजी मारली. उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकने बडोद्याला आणि महाराष्ट्रने पंजाबला पराभवाची धूळ चारली. कर्नाटक आणि महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उर्वरित दोन संघांसाठी उपांत्यपूर्व फेरीत गुजरात विरुद्ध हरियाणा आणि विदर्भ विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना होणार आहे. या दोन सामन्यातील विजेते संघ उपांत्य फेरी गाठणार आहे. गुजरात आणि हरियाणा यांच्यातील सामना वडोदराच्या कोटंबी मैदानात होणार आहे. तर विदर्भ विरुद्ध राजस्थान सामना वडोदराच्या मोती बाग स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता हे दोन्ही सामन्यांना सुरुवात होणार आहे.

गुजरात विरुद्ध हरियाणा

गुजरात संघ: आर्या देसाई, उर्विल पटेल (विकेटकीपर), उमंग कुमार, सौरव चौहान, अक्षर पटेल (कर्णधार), हेमांग पटेल, विशाल जयस्वाल, चिंतन गजा, रवी बिश्नोई, अरझान नागवासवाला, प्रियजितसिंग जडेजा, जयमीत पटेल, अभिषेक देसाई, धृषेश सोनी , जयवीर परमार, क्षितिज पटेल, सिद्धार्थ देसाई.

हरियाणा संघ: अर्श रंगा, हिमांशू राणा, अंकित कुमार (कर्णधार), पार्थ वत्स, निशांत सिंधू, राहुल तेवतिया, दिनेश बाना (विकेटकीपर), सुमित कुमार, अंशुल कंबोज, अमित राणा, अमन कुमार, अशोक मेनारिया, हर्षल पटेल, जयंत यादव , कपिल हुडा , युवराज योगेंद्र सिंग , मयंक शांडिल्य , वेदांत भारद्वाज, धीरू सिंग, आदित्य दीपक कुमार.

विदर्भ विरुद्ध राजस्थान

विदर्भ संघ : यश राठोड, अपूर्व वानखडे, करुण नायर (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शुभम दुबे, पार्थ रेखाडे, आदित्य ठाकरे, यश कदम, प्रफुल हिंगे, हर्ष दुबे, अथर्व तायडे, नचिकेत भुते, अमन मोखाडे, दर्शन नळकांडे , यश ठाकूर, अक्षय वाडकर, ध्रुव शौरे.

राजस्थान संघ: अभिजीत तोमर, सचिन यादव, महिपाल लोमरोर (कर्णधार), दीपक हुडा, कार्तिक शर्मा (विकेटकीपर), समरपीत ​​जोशी, कुकना अजय सिंग, मानव सुथार, अनिकेत चौधरी, खलील अहमद, अमन सिंग शेखावत, दीपक चहर, राहुल चहर, कमलेश नागरकोटी, राजकुमार सैनी, रजत चौधरी, मोहित जैन, शुभम गढवाल, करण लांबा, सुमित गोदारा, जुबेर अली खान, राम मोहन चौहान, राजवीर सिंग राठौर