VHT 2025 : विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत कर्नाटकची एन्ट्री, उपांत्य फेरीत हरियाणाला नमवलं

| Updated on: Jan 15, 2025 | 10:57 PM

विजय हजारे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कर्नाटकने हरियाणाला 5 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह कर्नाटकने अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत कर्नाटकचा सामना महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ सामन्यातील विजेत्याशी होईल.

VHT 2025 : विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत कर्नाटकची एन्ट्री, उपांत्य फेरीत हरियाणाला नमवलं
Image Credit source: video grab
Follow us on

विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत नाणेफेकीचा कौल कर्नाटकच्या बाजूने लागला. यानंतर कर्नाटकने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकने 50 षटकात 9 गडी गवमून 237 धावा केल्या आणि विजयासाठी 238 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान कर्नाटकने 47.2 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात देवदत्त पडिक्कलने सर्वोत्तम खेळी केली. मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर टीमवर दडपण आलं होतं. पण ते दडपण दूर करत एकाकी झुंज सुरुच ठेवली. त्याला स्मरण रविचंद्रनची उत्तम साथ लाभली. देवदत्त पडिक्कल याने 113 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार मारत 86 धाव केल्या. तर स्मरण रविचंद्रन याने 94 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार मारत 76 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे हरियाणाचा विजय लांबला. तसेच कर्नाटकच्या फलंदाजांनी पुन्हा संधी दिली नाही. या सामन्यातील चांगल्या खेळीसाठी देवदत्त पडिक्कल याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

हरियाणाचा कर्णधार अंकित कुमार याने सांगितलं की, ‘आम्ही 20-30 कमी होतो, 20 षटकांनंतर आम्ही 100/1 होतो आणि 270-280 पर्यंत चांगले दिसत होते पण कर्नाटकने विकेट घेतल्या. कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे पण दोष संपूर्ण फलंदाजीवर आहे. कर्नाटकच्या दुसऱ्या विकेटच्या जोडीने शानदार खेळ केला आणि खेळ आमच्यापासून दूर नेला.’ तर कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालने सांगितलं की, ‘ प्रथम गोलंदाजी केल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगितले असते, तर तुम्ही 240 धावांचा पाठलाग कराल, तर मी हो म्हणालो असतो. पडिक्कल ऑस्ट्रेलियाहून आला आणि दोन मोठ्या खेळी केल्या. स्मरण देखील विलक्षण खेळला. कर्नाटकसाठी तरुणांनी जबाबदारी स्वीकारताना आणि विजय मिळवताना पाहून खूप आनंद झाला.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कर्नाटक (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अनिश केव्ही, स्मरण रविचंद्रन, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), अभिनव मनोहर, हार्दिक राज, श्रेयस गोपाल, प्रसीद कृष्णा, वासुकी कौशिक, अभिलाष शेट्टी.

हरियाणा (प्लेइंग इलेव्हन): अर्श रंगा, हिमांशू राणा, अंकित कुमार (कर्णधार), पार्थ वत्स, निशांत सिंधू, दिनेश बाना (विकेटकीपर), राहुल तेवतिया, सुमित कुमार, अनुज ठकराल, अंशुल कंबोज, अमित राणा