टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी याने मोठा कारनामा केला आहे. चक्रवर्थी याने विजय हजारे ट्रॉफीतील प्री क्वार्टर फायनल सामन्यात फिरकी गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानला 267 धावांवर गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. एकट्या वरुणने राजस्थानच्या अर्ध्या संघाला गुंडाळलं. वरुणने राजस्थानविरुद्ध 5 विकेट्स घेत ‘पंच’ दिला. वरुणच्या या कामगिरीमुळे राजस्थानचा डाव अडखळला. वरुणने अवघ्या 52 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. वरुणने यासह आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला दावा आणखी मजबूत केला आहे.
वरुण चक्रवर्थी याने अभिजीत तोमर, महिपाल लोमरुर, दीपक हुड्डा या तिघांना बाद केलं. तसेच अजय सिंग याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर खलील अहमद याला आऊट करत वरुणने आपली पाचवी विकेट घेत राजस्थानला नववा झटका दिला.
राजस्थानचा कॅप्टन महिपाल लोमरुर आणि ओपनर अभिजीत तोमर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली होती. त्यामुळे राजस्थान सहज 300 पार मजल मारेल, हे निश्चित समजलं जात होतं. मात्र वरुण चक्रवर्थी याने गेम बदलला. वरुणने 5 विकेट्स घेतल्याने राजस्थानला 300 पार मजल मारण्याचं सोडा धड 50 ओव्हरही खेळता आलं नाही. वरुणने अभिजीत आणि कॅप्टन लोमरुर ही जोडी फोडली आणि राजस्थानला दुसरा झटका दिला. त्यानंतर वरुणने दीपक हुड्डाला 7 धावांवर बाद केलं. तसेच वरुणने त्यानंतर अभिजीत तोमर याला 111 धावांवर आऊट केलं.
वरुणने या 5 विकेट्स घेत आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्यासाठी 12 जानेवारी अंतिम मुदत आहे. त्याआधी 11 जानेवारी रोजी बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा या तिघांची बैठक होणार आहे. या बैठकीत वरुणच्या नावाची चर्चा होऊ शकते. तसेच वरुणचा इंग्लंड विरूद्धच्या टी 20i-वनडेसह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.
वरुण चक्रवर्थीची फिरकी बॉलिंग
Beauty 👌
A strong comeback from Varun Chakaravarthy to dismiss Mahipal Lomror after being hit for a 6 off the previous ball 🔥#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/83z2auYwFH pic.twitter.com/QXYvLBcJGe
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 9, 2025
तामिळनाडू प्लेइंग ईलेव्हन : आर साई किशोर (कर्णधार), तुषार रहेजा, एन जगदीसन (विकेटकीपर), बूपती कुमार, बाबा इंद्रजीथ, संजय यादव, विजय शंकर, मोहम्मद अली, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि त्रिलोक नाग.
राजस्थान प्लेइंग ईलेव्हन : महिपाल लोमरोर (कर्णधार), अभिजीत तोमर, सचिन यादव, कार्तिक शर्मा (विकेटकीपर), दीपक हुडा, समरपीत जोशी, अमन सिंग शेखावत, मानव सुथार, कुकना अजय सिंग, खलील अहमद आणि अनिकेत चौधरी.