IND vs AFG : वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली याने मागितली माफी? सामन्यानंतर नवीन उल हकचा मोठा खुलासा!

| Updated on: Oct 12, 2023 | 10:45 AM

Virat Kohli & Naveen Ul Haq Convsersation : भारत आणि अफगाणिस्तान सामन्यामध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक बुधवारी झालेल्या सामन्यात परत एकदा आमने-सामने आले. मात्र यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली, नेमकं कोण काय बोललं जाणून घ्या.

IND vs AFG : वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली याने मागितली माफी? सामन्यानंतर नवीन उल हकचा मोठा खुलासा!
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि अफगाणिस्तानमधील मॅचमध्ये भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा याने डोळ्यांचं पारणं फेडणारी शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात सर्व क्रिकेट जगताच्या नजरा विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्याकडे होत्या. आयपीएलमध्ये झालेल्या दोघांमधील वादामुळे बुधवारचा सामना प्रेक्षणीय होता. मात्र दोघांनी वाद मिटवता घेतल्याचं सामन्यामध्ये पाहायला मिळालं. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल नवीनने सामन्यानंतर खुलासा केला.

काय म्हणाला नवीन उल हक?

विराट कोहली मैदानात येण्याआधी कॅप्टन रोहित शर्माने मोर्चा आपल्या हातात घेत अफगाणिस्तान संघाच्या तोफेच्या तोंडावर ठेवलं होतं. असा एकही बॉलर नाही ज्याला रोहितने सोडलं नाही, जो सापडेल त्याला दे दणादण. रोहितच्या तुफानी खेळीने सामना एकतर्फी झाला. इशान किशन आऊट झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. मग काय एन्ट्रीलाच स्टेडिअममध्ये फुल आवाज… कोहली …कोहली हे फक्त विराटसाठी नाहीतर त्याच्याशी पंगा घेतलेल्या नवीन उल हकसाठी होतं.

आयपीएलमध्ये नवीन उल हक याने कोहलीला हलक्यातच घेतलं होतं. मात्र वर्ल्ड कपममध्ये आमने सामने आल्यावर भाऊ नरमला.  कोहलीनेच मोठं मन दाखवलं, कोहली मैदानात असताना चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडलं होतं आणि नवीनवरही निशाणा साधत होते. कोहलीलाच राहवलं नाही त्याने चाहत्यांना घोषणाबाजी बंद करायला लावली. त्यानंतर नवीन आणि विराट यांनी शेक हँड करत गळाभेट घेतली.

सामना संपल्यानंतर नवीन म्हणाला, कोहलीचं होम ग्राऊंड असल्याने चाहते त्याला सपोर्ट करत होते, कोहली एक चांगला माणूस असून एक महान खेळाडू आहे. तर विराट त्याला, जे झालं ते आता विसरून गेलं पाहिजे. आयपीएलच्या मैदानात जे झालं ते त्या मैदानापुरतं मर्यादित असल्याचं म्हणाला.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (C), रहमानउल्ला गुरबाज (W), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (C), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.