Virat Kohli | विराट शतकाच्या अर्धशतकानंतर क्रिकेटचा देव सचिनसमोर नतमस्तक

| Updated on: Nov 15, 2023 | 8:09 PM

Virat Kohli bows Down to Sachin Tendulkar | विराट कोहली याने सचिन तेंडुलकर याच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियममध्ये इतिहास रचला. विराटने सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड उध्वस्त केला. यानंतर विराट सचिनसमोर नतमस्तक झाला.

Virat Kohli | विराट शतकाच्या अर्धशतकानंतर क्रिकेटचा देव सचिनसमोर नतमस्तक
Follow us on

मुंबई | न्यूझीलंड विरुद्ध विराट कोहली याने वनडे करियरमधील 50 वं शतकं झळकावलं. विराटने यासह सचिन तेंडुलकर याला मागे टाकलं. सचिनने वनडेमध्ये 49 शतकं केली होती. विराट शतक ठोकल्यानंतर भावूक झाला. विराट गुडघ्याच्या आधारावर बसला आणि हेल्मेट काढला. विराट त्यानंतर सचिनसमोर नतमस्तक झाला. त्यानंतर सचिनही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होता. सचिनने आपल्या डोळ्यांनी आपला वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक होताना पाहिला. सचिनने टाळी वाजवून विराटचं शतकासाठी अभिनंदन केलं. सचिनने स्टँडिंग ओवेशन दिल्याने विराट भावूक झाला. तसेच अनुष्का शर्मा हीने विराटला फ्लाईंग किस दिली.

विराटची दमदार शतकी खेळी

विराटने न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार बॅटिंग केली. कॅप्टन रोहित शर्मा याने तडाखेदार सुरुवात करुन दिली. विराटने शतकादरम्यान झंझावाती खेळी केली. मात्र अखेरच्या टप्प्यात विराटने संथ खेळी केली. मात्र विराटने सिंगल डबल रन्स घेत शतक पूर्ण केलं. विराटने 113 बॉलमध्ये 9 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 117 धावा केल्या.

न्यूझीलंडसमोर 398 धावांचं आव्हान

दरम्यान विराट कोहलीशिवाय टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर यानेही शतक केलं. श्रेयस अय्यर याने 105 धावांची शतकी खेळी केली. श्रेयसने 70 बॉलमध्ये 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. कॅप्टन रोहित शर्मा याने 47 रन्सचं योगदान दिलं. रोहितने 29 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने या 47 रन्स केल्या. शुबमन गिल याने 66 चेंडूत 80 धावांचं योगदान दिलं. केएल राहुल 39 धावांवर नाबाद परतला. तर सूर्यकुमार यादव याने 1 रन करुन आऊट झाला. न्यूझीलंकडून टीम साऊथी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट याने 1 विकेट घेतली.

विराट सचिनसमोर नतमस्तक


न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन | केन विल्यमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.

टीम इंडिया प्लेईग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.