मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना आहे. सेंच्यरियन येथे सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिका संघाची सुरूवात खराब झाली होती. दुसऱ्या विकेटसाठी मोठी भागीदारी झाली होती. जसप्रीत बुमराह याने ही जोडी फोडली. ही विकेट जाण्याआधी कोहलीने जे काही त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
आफ्रिकेचा संघ बॅटींगसाठी उतरला आणि अवघ्या 11 धावांवर सिराजने पहिली विकेट घेतली. टीम इंडियाला पहिलं यश लवकर मिळालं. मात्र त्यानंतर डीन एल्गर आणि टोनी डी जोर्जी यांनी टिकून राहत आफ्रिकन गोलंदाजांचा घाम काढला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपली संपूर्ण ताकद लावली खरी पण विकेट काही मिळत नव्हती. यादरम्यान विराट कोहलीने काळी जादू केली.
What has Stuart Broad done… 😅😅#INDvsSA #INDvSA #Cricket #CricketTwitter
pic.twitter.com/gNoBfsdCtD pic.twitter.com/gt65BnHMZH— Cricket Minister of India (@2_Wickets_Down) December 27, 2023
विराट कोहलीने 27 वी ओव्हर संपल्यावर स्टंप्सच्या बेल बदली केल्या. त्यानंतर 28 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या शेवटच्या बॉलवर दुसरी विकेट गेली. टोनी डी जोर्जी 28 धावांवर परतला. विराट कोहलीने बेल्स बदली केल्यावर विकेट गेल्याने सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा